या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ११ वा. १३९ राच्या आवडत्या दाईचा मुलगा असल्यामुळे प्रायः ज्याचे राजघराण्याशीं नातें होतें व जो बादशहाचे सैन्यांतील अति मोठा दरकदार होता त्या मुसलमान सरदाराच्या मुलीशीं लग्न लाविलें होतें. तेव्हां या दोन्ही सरदारांनी संगनमत केले व ते शहाजादा सलीम यास वगळून खुस्तू यास तक्तावर बसविण्याच्या खटपटीस लागळे. हा हेतु साधण्याकरितां या उभयतां सरदारांनी अकबर आग्र्याच्या किल्ल्यांतील राजवाड्यांत आजारी पडला होता त्या किल्ल्यावर आपल्या सैन्याचा पहारा ठेविला. कर्म- धर्म संयोगानें अकबराचा एव्हांच अंत झाला असता तर आपसांत मोठी कढाई माजली असती; कारण सलीम आपला हक्क निमुटपणे सोडणार नव्हता. परंतु हा कट सलीमला कळून आल्याबरोबर त्याला आपल्या जीविताविषयीं भीति वाटून तो आग्र्याहून निघाला व थोड्या अंतरावर जाऊन राहिला. हे दुखणे आपले शेवटचें आहे अर्से अकबरास पूर्ण- पर्णे अवगत होतें. तेव्हां अशा प्रसंग शहाजादा सलीम संनिध नाहीं अर्से पाहून त्याच्या मनाला मोठा विषाद वाटला. शिवाय, कायदेशीर - पणाची त्यास अत्यंत आवड असल्यामुळे त्याने आपले अमीर उमराव आपल्या सभोवती बोलाविले ; व त्यांच्यासमोर शहाजादा सलीम हा माझ्या मार्गे गादीचा योग्य वारसदार आहे असें त्यांस कळविलें व खुनू यास बंगालची सुभेदारी देऊन त्याची तरतूद केली जावी अशी आपली आशा त्याने प्रगट केली. अकबराचें वजन या समयीं जेवढे दृष्टीस पडलें तसें पूर्वी कधीही दिसलें नव्हतें. आपली आज्ञा भंग करणाऱ्या व कृतघ्न अशा मुला- विरुद्ध बादशहाचा एक रागाचा शब्द त्याला गादीला मुकविण्यास बस होता. तसेंच दुसऱ्या पक्षीं त्यास अनुकूळ असे उद्गार निघाल्या - मुळेच केवळ, अति बलाढ्य अमीर उमरावांस बादशाहाची शेवटची इच्छा पुरी करावीसें वाटलें. कच्या मनाचे आणि " होते त्यांची ही तिकडेसच प्रवृत्ति कायम झाली. डळमळीत असे जे सैन्यांतील अति मोठा