या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४० अकबर बादशहा. सरदार, शाहजादा खुनू याचा प्रत्यक्ष सासरा, ज्यानें नुक्तेच थोड्या दिवसापूर्वी खुनूचा पक्ष सबळ करण्याकरितां राणा मानसिंग याच्याश राजकारण सुरू केलें होतें, त्याला देखील बादशहाचें वजन अपरिहार्य झालें. त्यानें खाजगी रीतीनें शहाजादा सलीम याजकडेस जासूद पाठवून आपल्या अनुकूलतेविषयीं खातरी दिली. या आणीबाणीच्या विशेष प्रसंगीं सर्वाहून भारदस्त असलेला जो राणा मानसिंग त्यानें देखील आपण एकटेच राहिलों असें पाहून सलीम यानें लाविलेलें बोलणें मान्य केर्के व त्याची बाजू धरण्याचे अभिवचन दिले. या- प्रमाणे आपणास आतां गादी मिळण्यास आडकांठी राहिली नाहीं अशी खात्री झाल्यावर, शहाजादा सलीम राजवाड्यांत गेला. तेथें मरणो- न्मुख झालेल्या अकबरानें त्याची गांठ ममतापूर्वक घेतली. या भेटींत ज्या गोष्टी घडल्या त्या शहाजाद्यानें वर्णन केल्यावरूनच माहीत झाल्या आहेत. प्रथम ममतेचे कुशल प्रश्न झाल्यावर अकबराने सर्व अमीर उमराव सरदार माझे समक्ष बोलवावे अशी शहाजाद्यास आज्ञा केली; कारण, तो ह्मणाला " जे आज वर्षोगणती माझ्या श्रमांचे व कष्टांचे विभागी झाले व ज्यांनीं मजबरोबर वैभव अनुभविलें त्यांच्यांत व तुझ्यांत कोणत्याही प्रकारचा बेबनाव राहावा हे माझ्याच्यानें साहवत नाहीं.” नंतर जेव्हां हे अमीर उमराव व सरदार आले व त्यांनीं बादशहास मुजरा केला तेव्हां तो त्या सर्वांस ह्मणून दोन शब्द बोलला. नंतर त्यानें एकामागून एक असे प्रत्येक सरदाराकडे न्याहाळून पाहिले व तुमच्यापैकी कोणाचें माझे हातून बरें वाईट झार्ले असल्यास मला क्षमा करा असे त्यांना विनंति- पूर्वक सांगितलें. तेव्हां शहाजादा सलीम यार्ने बादशहाच्या पायावर साष्टांग नमस्कार घातला व डोळ्यास पाणी आणिलें, अकबरानें खूण करतांच परिवारांनीं मुलाच्या कमरेस बादशहाची खास तरवार बांधिली व दरबाराचा शिरर्पेच व पोषाख त्यास घातला. हे झाल्यावर राजवाड्यांतील '