या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्त्रीवर्ग त्याच्या हवाली केला. भाग ११ वा. १४१ माझ्या पुरातन मित्रांस व सोबत्यांस मम- तेनें व आदराने वागवावें ह्मणून शहाजाद्यास आग्रहपूर्वक सांगितले व मग आपर्ले डोकें लववून त्यानें प्राण सोडला. माहे अक्टोबर सन १६०५ इ० रोजी घडली. ही गोष्ट तारीख १५ तेव्हां त्याच्या वयास ६३ वर्षे पुरीं होऊन एक दिवस जास्त झाला होता; असो. झाला. ह्याप्रमाणे मोगल बादशाहीचा खरा संस्थापक शांत मनानें परलोकवासी अकवर आपल्या आजापेक्षां व बापापेक्षां जास्त दैवशाली, जास्त दूरदर्शी व जास्त कल्पक होता. व तसेंच असेंहि ह्मणतां येईल कीं, त्याला कर्तृत्व दाखविण्याचे अधिक प्रसंगही मिळाले. कोणाची तरी सार्वभौम सत्ता कबूल केल्याशिवाय निर्भयता, खरें स्वातंत्र्य, व आपल्या धर्माप्रमाणें आणि परंपरायत रीतीप्रमाणे वागण्याची मुभा, हीं अनुपम सुर्खे प्राप्त होणार नाहींत, असें हिंदुस्थानांतील नानाविध जातींच्या प्रत्ययास आणून खात्री करून देण्यास पुरे, इतका काल पावेतों तो ईश्वर कृपेनें जगला. जातीसंबंधानें दुराग्रह ह्मणून कसा तो त्यास ठाऊक नव्हता. तो सर्व जातीचे प्रजेस मानमरातब व रोजगार धंदा देई; मग ते युझबेक असोत, अफगाणी असोत, हिंदू असोत, पारशी असोत, वा ख्रिस्ती असोत; मात्र ते प्रामाणीक, बुद्धिमान व नेकीचे असले ह्मणजे झाले. या निरनिराळ्या जातींना कळून आलें कीं, ह्यानें ४९ वर्षे राज्यशकट चालविला त्या अवकाशांत हिंदुस्थानांत परकी- यांच्या स्वारीपासून काडीमात्र उपद्रव झाला नाहीं. देशांतील एकंदर शत्रु त्यानें, कांहीं संग्राम करून व कांहीं सामोपचारार्ने, असे आपल्या अंकित करून टाकिले; व त्याला दुसरा मार्ग ह्मणजे सामोपचारच जास्त पसंत होता. त्याच्या पश्चात महमद अमीन यार्ने लिहिलेल्या इतिहासांत झटके आहे की 'हिंदुस्थानच्या चारी ही दिशांवर त्याचा अंमल न्यायी व दृढ अशा प्रकारचा होता. हरएक तऱ्हेचे व हरएक दर्ज्याचे सर्व लोक त्याच्या दरबारांत असत. चोहोंकडे व सर्व जातींत व वर्गात