या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४२ अकबर बादशहा. एकंदर सर्व शांतता असल्यामुळे प्रत्येक वर्णाचे लोक सुरक्षितपर्णे नांदत होते. अकबर बादशाही या तऱ्हेची होती. मनुष्य ह्या नात्यानें अकबर कसा होता हें आतां पाहर्णे राहिलें आहे. तें पुढील भागांत पाहूं. भाग १२ वा. देशांतील राज्यकारभार व आईन ए अकबरी. ॥ प्रजानां विनयाधानाद्रक्षणाद्भरणादपि ॥ ॥ स पिता पितरस्तासां केवलं जन्महेतवः ॥ ॥ संरक्षिलें प्रजेला शिकवुनियां उन्नतीस ही नेलें ॥ ॥ नच जन्मदातृ पितरां, नृपतिकडे तत्पितृत्व परि आलें ॥ " राज्यकारभाराचीं जीं तीन राजकीय, सामाजिक, व धर्मविषयक अंगे आहेत त्यांत फार किंवा थोर्डे यश संपादर्णे, व प्रजाजनांच्या इच्छा पूर्ण करणे या गोष्टी, राजा आपल्या काळाचा विनियोग जसा करितो त्यावर अवलंबून असतात," असें आईन ए अकबरी रचणान्या इतिहासकाराने लिहिलें आहे. ही कसोटी लावून पाहिलें असतां, अकबरास, बादशहा या नात्यानें व साधारण मनुष्य या नात्यानें में यश प्राप्त झाळें त्याचा कार्यकारण- संबंध तर्कशास्त्राचे सिद्धांतांस अनुसरून लावितां येतो. तो पद्धतशीर होता, इतकेंच नाहीं तर त्याचे पद्धतींत सदासर्वदा ही उत्कट इच्छा दिसून येत होती कीं, प्रजाजनांच्या अंतःकरणांत जिचा पाया बांधला आहे व जी राज्य करणाऱ्या व्यक्ति-विशेषावर अवलंबून राहणार नाहीं, अशी राज्यरूपी इमारत उभारण्याचा आपल्या जन्माचा जो मोठा हेतु त्यास साधक कोणतें व वस्तुतः रास्त कोणतें ह्याचें नित्य मनन करावें व त्याप्रमाणे वागावें. हा हेतु साधण्याकरितां त्यानें जे उपाय योजिले त्यांचें खुलासेवार सविस्तर विवरण करण्यापूर्वी त्याचें मनच स्वभावतः