या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकबर बादशहा.

भाग अतिशय मनोरंजक आहे असें सांगण्यास आह्मांस हरकत वाटत नाहीं. ह्मणून पुस्तकांतील पहिला भाग वाचण्याची तसदी होईल तिचा मोबदला या भागांत वाचकांस मिळेल; करितां त्याबद्दल क्षमा करावी अशी त्यांस विनंति आहे.



भाग दुसरा.

-

बाबराचें घराणें व त्याचें लहानपण.

॥ भवोहि लोकाभ्युदयाय तादृशाम् ॥
॥ जन्महि अशा जनांचा भाग्योदय सकल सृष्टिचा साधी ॥

 समरकंदच्या उत्तरेस, तीस मैलांवर शहर - सब्ज मुक्काम, शुद्ध मोंगल वंशांतील बिरबास नांवाच्या एका शाखेच्या अधिपतीस तारीख ९ एप्रील सन १३३६ ईसवी रोज त्याचे गादीचा वारसदार होणारा त्याचा वडील मुलगा जन्मास आला.त्याचें नांव तैमूर. तैमूरची आई चेंगीझखानाच्या वंशापैकीं होती.लोकांवर सत्ता चालविण्यास जे गुण लागतात ते निसर्गतःच त्याच्या अंगीं होते. सुदैवें करून या गुणांचा उत्तम रीतीनें उपयोग करून दाखविण्यास यास. योग्य संधि मिळाली. चेंगीझखानाच्या घराण्यांतील वंशज उत्तरोत्तर दुर्बल व आळशी होत गेले, व सन १३७० ईसवी सालीं त्यांचा निर्देश झाला. त्यावेळीं तैमूरचें वय ३४ वर्षांचें होतें. त्यानें ही रिकामी झालेली गादी बळकाविली. दैवाचें पारर्डे अनेक वेळां खाली वर होऊन शेवटीं त्याची पूर्ण सरशी झाली; व आक्स आणि झगझारटिस या दोन नद्यांच्या मधील संपूर्ण प्रदेशाचा तो निष्कंटक राजा होऊन बसला. यानंतर त्यानें दिग्विजयास आरंभ केला; तो आमरण चालू होता. त्याची सत्ता मुधलीस्थानांत ह्मणजे ज्या प्रदेशाच्या दक्षिणेस तिबेट देशांतील पर्वत, सिंधुनद, आणि मेकान आहेत व उत्तरेस सायबेरिआ