या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १२ वा. १४३ कसें होतें व मनुष्यजातीच्या धर्मविषयक गोष्टींचा त्यावर काय परिणाम झाला होता याचा आपण प्रथम विचार करूं. कारण, ही गोष्ट एकदां समजली ह्मणजे त्याच्या राजनीतीचा पायाच मिळाला असे होईल. याहून अधिक महत्वाचें कोणचेंही कोर्डे आपणांस सोडविणे नको. त्या काळचा मोठा प्रश्न हा होता की, संख्येने थोडे व आपणांखेरीज इतर धर्मातील सर्व लोकांस सतत नरकवासच भोगला पाहिजे असें समजणारे जे विजयी मुसलमान लोक, त्यांच्या अधिपतींला, हिंदुप्रजाजनांनीं अशक्य ह्मणूनच ह्यटलें असतें इतके पूर्ण रीतीनें आपले दुराग्रह सोडून द्यावे, अशी त्यांची प्रीती व विश्वास मिळवितां येईल कीं नाहीं ? हैं महत्कृत्य साधावयाचें तें केवळ अकबराच्या मनावर, स्वभावावर, आणि परधर्मीय लोकांचे विचार मोकळेपणानें स्वीकारण्याचे व न्याय्य रीतीनें समजण्याचे शक्तीवर अवलंबून होतें. या बाबतींत उदात्त व उदार अशा राजनीतीच्या वृद्धीस खरोखर प्रतिकूळ असा त्या वेळचा काळ होता. मुसलमानलोक हे नुसते देश जिंकणारे होते असें नाहीं ; तर ते तरवारीच्या बळाने आपल्या धर्माचा विस्तार करणारेही होते. या काळाच्या इतिहासकारांपैकी बदौनी या नांवाच्या इतिहासकाराच्या लेखांतील प्रत्येक पानांत हिंदूधर्माविषय व त्या धर्माच्या लोकांविषय, पेगमबराच्या निस्सीम अभिमान्यांना जो तिरस्कार वाटत होता तो स्पष्ट दिसून येतो. हा तिरस्कार फक्त हिंदूधर्माविषयच होता असें नाहीं. महमुदीयपंथाव्यतिरिक्त इतर ईश्वरोपासनेच्या सर्व धर्माविषयीं त्यांस सारखाच तिटकारा असे. अशा पंथांत अकबराचा जन्म झाला, परंतु जन्मतःच त्याची बुद्धि विचक्षण व कोणतीही गोष्ट गृहीत ह्मणून न घेणारी अशी होती, हे ब्रह्मधर्मानुयायी ( हिंदु ) आहेत ह्मणून यांना सदैव नरकंवास घडणार, अशी ज्या राजांसंबंधानें त्याच्या दरबारांतील मंडळीच्या मनाची समजूत