या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४४ अकबर बादशहा. होती, ते पुरुष स्वामिभक्ति, एकनिष्ठा, औदार्य इत्यादि सद्गुणगणांन संपन्न आहेत, असें तो कहान असून शिकत होता त्या काळ त्याचे नजरेस अनेकदां आलें. त्याचे लक्षांत आणखी असेंही आलें कीं आपल्या प्रर्जेत मुख्य भरणा ह्मणजे हिंदूंचा, त्यांत अशा प्रकारचे उदारशील व सद्गुणमंडित पुरुष पुष्कळ आहेत. याशिवाय, त्याच्या ध्यानांत आणखी असेही आले की ह्यांपैकी अनेक लोक अति प्रामाणिक व राजनिष्ठ असून राजाचा धर्म स्वीकारिला असतां आपणास व्यवहारदृष्ट्या मोठें हितकर होईल अर्से उघडपर्णे दिसत असतांही, तो न अंगिकारितां “स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः” या भगवद्वचनास स्मरून आपल्याच धर्मास चिकटून राहिले. मी जेता आहे, मी राज्यसत्ता चालविणारा आहे, आणि माझा जन्म महमुदीय पंथांत झाला आहे, तेव्हां तोच पंथ मनुष्यमात्रांनी खरा मानिला पाहिजे, ही कल्पना ग्रहण त्याच्या विचारशील बुद्धीस प्रशस्त वाटत नसे. करणें, अगर्दी प्रारंभापासून हळू हळू हे विचार पुढील शब्दांनी व्यक्त झाले " जर मलाच धर्ममार्गाची वाट सांपडली नाहीं तर ती इतरांस दाखविण्याचा अधिकार मजकडे आहे, असा तोरा मी तरी कां मिरवावा?" पुढे जसजशी इतर मर्ते त्यास अवगत होऊं लागलीं, तसतशीं संप्रदायाचीं व धर्ममार्गाचीं स्वधर्माच्या बाबतींत त्याच्या धर्माभिमानाचा - मग तो ज्या खन्या शंका होत्या त्या सुदृढ झाल्या. कोणत्याही पंथाचा असो - हटवाद व अनुदारपणा प्रत्यहीं त्याच्या नज- रेस पडूं लागला, तेव्हां तर सर्वत्रांस धर्मस्वातंत्र्याची मुभा असलीच पाहिजे, असें त्याचें मत जास्त जास्त दृढ होऊं लागलें. अकबराच्या धर्मसंबंधी विचारांत झालेला हा जो फरक तो एकदम झाला असें नाहीं. इतिहासकार बदौनी, जो दुराग्रही मुसलमान होता ह्मणून, त्याचे मतें बादशहाच्या झालेल्या धर्मभ्रष्टतेविषयीं ज्या फार खेद वाटंत असे, त्यानें या बाबतींत लिहिले आहे की :- " अगदी बालपणापासून तो तरुणपणापर्यंत व तरुणपणापासून तो वार्धक्यापर्यंत