या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १२ वा. १४५ बादशहाच कितीतरी धर्मसंबंधी अनेक तऱ्हेचीं विचारांतरे झालीं, आणि तो बहुतेक सर्व प्रकारच्या धर्माचारांतून व नानापंथांतून गेला, व आपल्या आंगीं असलेल्या क्षीरनीर निवडण्याच्या विशेष चातुर्यानें व त्याचप्रमाणें महमुदीय धर्माच्या प्रत्येक तत्वास असंमत अशा शोधक बुद्धीनें, निरनि- राळ्या ग्रंथांत सांपडणाऱ्या हरएक धर्मरहस्याचा त्यानें संग्रह केला. " अशा प्रकारें त्याच्या हृदयरूपीं आरशांत अनेक धर्मांच्या मूलतत्वांपासून उत्पन्न झालेलें नवीनच एक धर्मविचारांचें प्रतिबिंब उमटलें गेलें ; व मनावर अनेक प्रकारचे संस्कार घडत गेल्यामुळे त्याच्या मनावर दगडा- वरील वळणाप्रमार्णे असा ग्रह पक्का होत गेला कीं, प्रत्येक धर्मोत सूज्ञ असे लोक असतात, व प्रत्येक देशांत दुराग्रह सोडून संथपणे विचार करणारे, व ईश्वरी अनुग्रह झालेले, असे अवतारी पुरुष सांपडतात. तेव्हां तो अशी कोटी लढवूं लागला कीं, जर कांहीं तरी सत्यज्ञान चोहोंकडे आढळून येतें, तर तें एक - धर्मांतर्गतच का असावे? किंवा तें ज्याची प्रवृत्ति होण्यास पुरीं सहस्र वर्षेही झालीं नाहींत व ह्मणून जो इतरांशीं तोलतां आधुनिक आहे, अशा फक्त पेगमबराच्याच धर्मांत कां असावें? आणि एका पंथानें प्रतिपादिलेला सिद्धांत दुसऱ्या पंथानें असत्य ह्मणूनच कां मानावा? त्याचप्रमाणे ज्यास कोणत्याही प्रकारच्या श्रेष्ठत्वाचा अनु- ग्रह झालेला नाहीं, अशा पंथानें वरिष्टपणाचा तोरा तरी कां मिळवावा ? हाच बदौनी आणखी अर्से ह्मणतो कीं, अकबर बादशहा ब्राह्मण व सन्याशी यांजवरोबर धर्म विषयांवर उहापोह व वादविवाद करी; व त्यांच्यापासून झालेल्या संस्कारामुळें आत्म्याच्या पुनर्जन्माचा सिद्धांत त्यानें ग्रहण केला. तथापि, अकबराच्या धर्मसंबंधी विचारास जी दिशा मिळाली तीस फैझी व अवुलफझल हेच मुख्यत्वें कारणीभूत झाले, या विषयीं तिलप्राय शंका नाहीं. हे दोघे भाऊ अकबर बादशहाप्रमाणेंच पेगमबराचे धर्मात जन्म होऊन त्यांतच लहानाचे मोठे झाले होते. या उभयतां निख्यात व वजनदार पुरुषांचा थोडासा वृत्तांत देणें अवश्य आहे. यांचा 19