या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १२ वा. १४७ शेख फैझीच्या अलौकिक गुणांची कीर्ति चोर्होकडे पसरली होती, ती ऐकून अकबराने त्यास चितूरला वेढा घालून त्याचें गोट होर्ते तेथें येण्या- विषयीं निमंत्रण पाठविलें. शेख फैझीचे शत्रु, जे जुन्या अथवा सुन्नी पंथाच्या मुसलमानांत जास्त होते. त्यांना ही बातमी समजली तेव्हां बादशहा यार्चे आतां खास पारिपत्य करणार, व येवढ्याच करितां त्यानें हैं निकडीचें पाचारण केलें असावें, असें मानून त्यांनी आग्र्याच्या सुभेदारास सुचविलें कीं, न जाणो कदाचित् फैझी पळून जाईल, सबब त्यावर चांगलें ध्यान ठेवावें; परंतु पळ काढून सुटका करून घेण्याची कल्पना फैझीच्या मन मानसींही नव्हती. त्यास कैद्याप्रमाणेच अकबराचे गोटांत नेऊन पोहों- चविलें. पण दरबारीं बादशहानें त्याचे स्वागत बहुमानानें केलें व त्याच्या बहुविधज्ञानानें बादशहाची चित्तवृत्ति इतकी तल्लीन होऊन गेली कीं, त्यानें थोडक्याच दिवसांत त्यास आपल्या दरबारांत नेमणूक करून दिली; व शहाजाद्यांचें ह्मणजे आपल्या मुलांचें उच्च प्रतीचें शिक्षण देण्याचें काम त्याजकडेस सोंपविलें. प्रसंगविशेषीं बादशहा त्यास परराज्यसं- -बंधीं वकीलीवरही पाठवी. शेख फैझीस फुरसत विपुल असे व तो तिचा विनियोग काव्यरचने- कड़े करी. त्याचे तेहतीसावे वर्षी राजकवीच्या जागीं त्याची नेमणूक झाली. पुढे सात वर्षांनीं तो मरण पावला. अखेरपर्यंत बादशहाची मर्जी त्यावर असे. त्याचा समागम बादशहास अत्यंत सुखदायक वाटत असे; व त्याच्या संभाषणार्ने तर तो आनंदसागरांत निमग्न होई. एकशेएक पुस्तकें लिहिलीं असें ह्मणतात. त्याचा पुस्तकाचा भरणा फार नामी होता व त्यांत निवडक असे ४३०० हस्तलिखित ग्रंथ होते. - त्यांची बादशहानें आपल्या पुस्तकसंग्रहांत भर घातली. त्याने शेख फैझीवर बादशहाची अत्यंत कृपा होती हें खरें पण त्याचा भाऊ शेख अबुलफझल–आईन ए अकबरीचा कर्ता यावर तर त्याहूनही जास्त मर्जी होती. हा आग्र्याजवळ तारीख १४ जानेवारी सन १९५१