या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४८ अकबर बादशहा. रोजी जन्मला. भावाप्रमाणे त्यालाही बापाने दिलेल्या उदार व विविध शिक्षणाचा लाभ मिळाला होता. आपल्या बापाची विशाल बुद्धि, विचाराटवींत स्वैरपर्णे फिरूं लागल्यामुळे ज्या मताकडे त्याचा कल झाला त्यामताबद्दल त्याला घातलेला बहिष्कार, व बहिष्काराहूनही अधिक दुःखें सहन करावी लागली, ही गोष्ट त्याच्या लक्ष्यांत आल्याशिवाय राहिली नाहीं; व त्याबद्दल तो मनांतल्या मनांत चडफडत होता. याचा परिणाम हा झाला कीं, त्या मुलाचे मनावर धर्मस्वातंत्र्याचा उमटला. शिवाय विपत्तीमुळे ज्ञानार्जनाचे काम त्याने मोठ्या जोराने अश्रांत मेहनत केली व त्याच्या वयास पुरी पंधरा वर्षे लोटलीं नाहींत तोंच त्यानें तर्कज्ञान व इतिहासकथादि अनेक शास्त्रांत व त्यांच्या निर- निराळ्या शाखा व उपांगें यांत पारंगतता मिळविली व विशी उलटण्या- पूर्वीच त्यानें शिक्षकाच्या धंद्यास सुरुवात केली. येवढ्या लहानशा वयांत त्याच्या अध्ययनाचा विस्तार केवढा जबर होता याविषयीं प्रोफेसर ब्लॉकमन, आईन ए अकबरीचा भाषांतरकार, ह्यार्ने एक मोठी मौजेची गोष्ट सांगितली आहे; ती अशी:- :- " एके प्रसंग इकफहानी या नांवाच्या विख्यात ग्रंथकाराचा एक अपूर्व हस्तलिखित ग्रंथ त्याचे हात पडला. परंतु दुर्दैवेंकरून हा ग्रंथ अग्निमुखी पडल्या- मुळें त्यांतील प्रत्येक पानाचा अर्धा भाग अगदीं वरपासून तो थेट खाल- पर्यंत पूर्णपणे जळून गेलेला अथवा वाचावयास दुर्बोध असा झालेला होता. अबुलफझल यार्ने असल्या दुर्लभ ग्रंथाचा उद्धार करण्याचा निश्चय केला. त्यानें त्या पुस्तकाचा जळालेला भाग कापून काढून त्या ठिकाणी प्रत्येक पानास नवीन कागद जोडिला ; व मग नष्ट झालेली एकून एक ओळ पुनः जुळविण्यास सुरवात केली. तें पुस्तक विचारपूर्वक अनेकवार वाचून शेवटीं त्या कार्यात त्यानें यश मिळविलें. पुढें कांहीं दिवसांनीं कर्मधर्म- संयोगानें त्याच ग्रंथाची दुसरी एक सबंध प्रत सांपडली. तेव्हां या मूळ प्रतीशीं अबुलफझलने रचलेल्या प्रतीचा मुकाबला पाहतां त्यांत