या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १२ वा. १४९ अनेक स्थळीं नवीन शब्दरचना व कित्येक स्थळीं तर नवीन प्रमाणें दाखल केलेली आढळल स्वरें. तथापि एकंदरींत ह्या नवीन जुळ- लेल्या भागाचें मुळाशीं इतकें विलक्षण साम्य दिसून आलें कीं, येवढ्या मोठ्या कठिण ग्रंथकाराची विचारसरणी व भाषापद्धति अबुलफझल यास पुरी अशी साधितां आली, याबद्दल त्याचे इष्टमित्रास फारच कौतुक च आश्चर्य वाटर्के. " निसर्गतःच अबुलफझल याची विद्याभ्यासाकडे निस्सीम प्रवृत्ति अस- ल्यामुळें बादशाही दरबारांत येण्याकरितां अकबराने त्यास निमंत्रण पाठ- विलें असतांही, कांहीं दिवसपर्यंत त्यानें तें मान्य केलें नाहीं. परंतु त्याचा वडील भाऊ फैझी व बादशहा यांच्यांत जो वर निर्दिष्ट केल्याप्रमाणें स्नेह- संबंध जडला होता, त्या योगानें ज्या विशेष मैत्रीविषयीं अकबर अगदीं उत्सुक झाला होता त्या मैत्रीचा मार्ग सुगम झाला; व इ०स० १५७४ च्या प्रारंभी, फैझीचा भाऊ ह्मणून अबुलफझक यास जेव्हां बादशहास भेटविर्के, तेव्हां त्याचें स्वागत व मानमान्यता अकबरानें इतक्या उत्तम तऱ्हेनें केली कीं, “निस्पृहस्य तृणं जगत् " या ह्मणीप्रमाणे कोणाची पर्वा न बाळगतां उदात्त रीतीनें एकांतवासीं राहण्याचा जो त्यानें निश्चय केला होता, त्याजविषयीं पुनः विचार करून त्यानें तो सोडला. या वेळीं त्याच्या वयाची नुक्तीच काय तीं तेवीस वर्षे उलटलीं होतीं. परंतु या अव- काशांत आपल्या जन्मभूमींत जितकें ह्मणून ज्ञानभांडार होतें तें सर्व त्यानें आपलेसे करून टाकिलें होतें. त्यानें स्वतःच लिहून ठेविलें आहे कीः–“ माझ्या मनास शांति ह्मणून ठाऊक नव्हती. माझे अंत:- करण मंगोलियांतीक परमहंस पुरुषाकडे व लेबेनॉन पर्वतावरील साधूं- कडे वेधून गेलेलें होतें. तिबेटांतील लामा व पोर्चुगाल देशांतील धर्माधिकारी पाद्री यांच्या समागमाची उत्कट इच्छा मला झाली होती; व पारशी लोकांच्या दस्तुरांच्या व झेंदावेस्ता शास्त्रांत पारंग झालेल्या विद्वानांच्या समागमांत मोठ्या आनंदाने काळ घालवावा