या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५० अकबर बादशहा. असें वाटे. मला आपल्या देशांतील विद्वानांचा केवळ कंटाळा आला होता. " या वेळेपासून अवुकफझल हा वादशाही दरबारांत आला. व त्याच्यांत व अकबरांत, परस्परांविषयीं सन्मानबुद्धि व परस्पर सहानु- भूति ह्यांपासून निर्माण होणारा जो स्नेह या इहलोकीय जीवित्वाचें एक आल्हादस्थान आहे, तो जूळून वाढला. बादशहा हा एक आपणास अतियोग्य शिष्य मिळाला, असें अबुलफझल यास आढळून आलें. मृगयेच्या चैनींत, राज्यभाराच्या चिंतेत, व लढाईचे परिश्रमांत अकबराला आपला संमाननीय मित्र व त्याचें मत खंडन करण्याचा प्रयत्न कर- णारे हटवादी मुसलमान कायदेपंडित व धर्मशास्त्रज्ञ ह्यांच्या 'जे वाद- विवाद चाळत ते ऐकण्यांत जे सुख व आल्हाद वाटे त्याच्या पुढे सर्व करमणुकी तुच्छ वाटत. हे वादविवाद ह्मणजे त्याच्या राजवटयां- तील एक मोठी घडामोड होती. ह्यांचा विशेष खुलासेवार उल्लेख केल्याशिवाय अकबराचा स्वभाव चांगलासा समजणें दुरापस्त आहे. धर्मस्वातंत्र्य व राज्यकारभारांत समदृष्टि ही दोन तवें, कीं जीं प्रचारांत आल्यामुळे हिंदुस्थानचे इतिहासांत एक महत्वाचें मन्वंतर सुरू झालें, तीं अकबराचे मनानें एकाएकीं ग्रहण केळीं असें नाहीं. त्याच्या राजव- व्याची पहिलीं वीस वर्षे तर त्यास आपली सत्ता राखण्याकरितां विजय संपादण्यांतच घालवावीं लागलीं. बंगाल, बिहार, ओरिसा व गुजराथ व खानदेश समेत पश्चिम हिंदुस्थान या प्रदेशांतील पूर्वी पदच्युत झालेल्या राजघराण्यांचे वंशज संधि मिळण्याची वाट पहात असतां, बादशहानें स्वस्थ राहर्णे, ह्मणजे त्यांस स्वतःवर स्वारी करण्यास निमंत्रण देण्या- सारखें होतें; तेव्हां त्यांस पुढे सरसावर्णे भाग पडलें. मागील अनुभवा- वरूनच व प्रतिदिनीं त्याच्या नजरेस ज्या गोष्टी पडत त्यावरून असे सिद्ध होतें कीं, हिंदुस्थानांतील प्रजाजनांस शांततेची सुखसमृद्धि पाहिजे अस- ल्यास, या देशभर फक्त एकच सार्वभौम राजसत्ता असणें अवश्य आहे. e