या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १२ वा. १५१ या वीस वर्षांच्या अवर्धीत लढाईचें काम बंद असतां अकबरास अनेक प्रसंग फुरसत सांपडे. तींत ज्या लोकांस आपण जिंकीत जात आ त्यांच्या अनुकूलतेच्या पायावर राज्यपद्धतीची सुदृढ अशी इमारत कशी रचितां येईल या प्रश्नाचा उहापोह तो आपल्या सन्निध असणान्या मुत्सद्यांशीं करी. त्याच्या मनाची खात्री झाली होती की जुन्या पद्ध- तींचा काळ जाऊन त्या आतां निरुपयोगी झाल्या आहेत; आणि भरत- खंडांतील रहिवाशी ह्मणजे पृथ्वीतलावरील सर्व लोकांपेक्षां अधिक कोंवळ्या मनाचे व सहज वळणाऱ्या हृदयाचे खरे रसिक आहेत व मनुष्य- मात्राच्या अंतःकरणास वेधून टाकणाऱ्या अशा अतिदृढ बंधनाच्या योगानें त्यांची वाडवडिलांच्या परंपरागत लोककथांविषयों प्रेमासक्ति फार जवर आहे; तेव्हां त्यांच्या मनोवृत्ति, लोककथा, तृष्णा व महत्वाकांक्षा यांचा कांहीं एक विचार न करितां केवळ सैन्याच्या बळावर जागजागीं गोट देऊन हिंदुस्थानदेश स्वाधीन ठेवर्णे, हें असंभवनीय आहे. या वरील पद्धतीचा चारशे वर्षांचा अनुभव पाहतां असें दिसून आले कीं, ती सुरू करणाराच्याच किंवा निदान त्याच्या मागून येणारांच्या कारकीर्दीत लौकरच ढांसळे. असें असतांही, अकबराच्या पूर्वी जे अनेक बादशहा होऊन गेले, त्यापैकीं एकानें देखील दुसरी एखादी पद्धति सुरू करण्याचा प्रयत्न केला नाहीं. त्यांचा प्रख्यात आना बाबर याच्या मनांत याबद्दल कांहीं नवीन प्रकार सुरू करणे अवश्य आहे अशी किंचि- तशी कल्पना आली होती; परंतु या गोष्टीस हात घालण्यास अवश्य इतका अवकाश त्यास सांपडलाच नाहीं. कारण, आपला स्वतःचा टिकाव धरण्याकरितां स्वाऱ्या करून जय मिळवीतच त्यास राहणें भाग पडलें. त्याचा बाप हुमायून याचे आंगीं हैं कोर्डे अफगाण बादशहापेक्षांही थोडीच होती. अशा योद्ध्यांशीं गांठ पडतांच त्याचा पाडाव सोडविण्याची योग्यता इतर याहून बलाढ्य व काबील झाला; आणि तेव्हां त्याची निराधार व पायाशून्य अशी राजपद्धति लागलींच नष्ट झाली, व तिचा