या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५२ अकबर बादशहा. मागमूसही उरला नाहीं. या गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहिल्यामुळे हिंदुस्थानांत चिरस्थायी राज्यपद्धति स्थापण्याची अवश्यकता अकबराच्या मनांत बिंबून गेली. जेते व जित यांत आदर वाढवून जातिभेद धर्मभेद व परंपरागत कथाभेद ह्यांच्या संबंधार्ने सर्वांस स्वातंत्र्य देऊन उभयतांच्या हिताहितांची सांगड घालून अशी इमारत उभारली पाहिजे कीं एक कमान पडली तर बाकीचे एकंदर दगड खाली कोसळावयाचेच, हे सर्व- त्रांस अगदीं स्पष्टपणे कळलें पाहिजे, हे अकबर यास हळू हळू समजून आलें; ह्मणून, वर लिहिल्याप्रमार्णे, त्यानें आपल्या राजवट्याची पहिली वीस वर्षे जिंकिलेल्या लोकांची राजनिष्ठा व त्यांचा आपलेवर भरवसा वाढेल अशा हृदय वेधणाऱ्या कोणच्या राजनीतीचा स्वीकार करावा याविषयीं आपल्या दरबारांतील राजपुरुषांशीं व विद्वान पंडितांशीं उहापोह करण्यांत घालविली. अबुलफझलशीं परिचय होण्याचे पूर्वी यासंबंधानें अकबराची बहुतेक निराशाच झाली होती व त्याने याविषयींचा विचारही बहुतेक सोडला होता. कारण, त्यास शहाणपणाची सल्लामसलत न मिळतां केवळ हट- वाद व अ-सहिष्णुता वाढेल अशाप्रकारच्या उपदेशाचीच गांठ पडत गेली. त्याच्या बाळपणच्या अमात्यांपासून तर त्यास यत्किंचितही मदत मिळण्याची आशा नव्हती. या मुसलमान लोकांच्या कलहांचा व धर्म भेदामुळे आपआपसांत देखील एकमेकांचा छल करणाऱ्या त्यांच्या प्रवृत्तीचा त्याला आगर्दी वीट आला होता. अबुलफझलच्या शिक्षेखालीं भिन्न- मतांविषयींचीं उदार सहिष्णुता त्यास कळून येण्यापूर्वीच त्याने असा सिद्धांत ठरविला होता कीं, कोणतीहि चिरस्थायी राज्यपद्धति स्थापन करण्याच्या पूर्वी, जें दुराग्रही मुसलमान धर्माभिमान्यांचें आपल्या स्वतःच्या राज्यांत प्रस्थ माजलें होतें, तें आधीं तोडलें पाहिजे. यासंबंधार्ने प्रोफेसर ब्लॉकमन यानीं असें लिहिलें आहे कीं, "हिंदूप्रजेच्या योग्यतेविषयीं अनुकूळ असा ग्रह अकबराच्या मनांत ठसल्यामुळे, फत्तेपूर शिक्री येथें संध्याका- •