या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग २ रा.


आहे, तेथें व किपचक नामक प्रातांत, ह्मणजे ज्यांत ज़क्सटरस नदीच्या मुखाचे व ऑरल आणि क्यास्पियन समुद्राचे उत्तरेकडील व डॉन आणि व्होल्गा यांसभोवतालचा सुपीक प्रदेश हीं समाविष्ट होतात तेथें त्यानें आपली सत्ता बसविली. त्याने हिंदुस्थान देश काबीज करून दिल्ली व डारडेनेलीस यांच्यामधील प्रदेशांतील लोकांस आपलें स्वामित्व कबूल करावयास लाविलें. तो तारीख १८ फेब्रुवारी १४०५ ई० रोनी मरण पावला. तेवेळी, त्याचें राज्य जगांत जीं मोठीं ह्मणून राष्ट्र होऊन गेलीं, त्यांच्या तोडीचें विशाल होर्ते.
 त्याच्या मरणानंतर त्याचें राज्य लागलेच मोडकळीस आले व जरी त्याचा पणतू अनुसय्यद यानें त्याचा अंशतः जीर्णोद्धार करून त्यांत व्यवस्था केली, तरी सन १४६९ सालीं आरडेबिल नांवाच्या पर्वता- जवळील खिंडींत शत्रूंनीं त्यावर एकदम घाला घातला व त्याच्या सैन्याची 'धुळधाण होऊन तो मारला गेला; त्यामुळे त्या राज्याचे लागलेच पुनः तुकडे तुकडे झाले व त्याच्या मुलांनी ते आपसांत वांटून घेतले. या मुलांपैकीं तिसरा मुलगा उमरशेखमिरझा याच्या हिश्शास फरघणा, तेथील राजधानीच्या नांवाने ही प्रसिद्ध असलेला खोकंड प्रांत आला .
 उमरशेख हा बाबराचा बाप. हा महत्वाकांक्षी असे. आपले राज्य विस्तृत करण्याचा त्याचा कृतनिश्चय होता. त्याच्या घराण्यांतील इवर मंडळीस ही पण त्याच्याप्रमाणेच महत्वाकांक्षा असल्यामुळे ती ही आप- आपले राज्य वाढविण्यास तत्पर होती. ईसवी सन १४९४ सालीं, , जेव्हां तो अपघाताने मरण पावला, तेवेळीं तो अक्षी एथील किल्ल्यांत असून त्यास शत्रूने वेढा घातला होता.हा किल्ला त्यानें आपली राजधानी केली होती. त्याचा वडील मुलगा बाबर यास तेव्हां नुकतेच बारावें वर्ष लागलें होतें, तो अक्षीहून ३६ मैलांवर अंडीजन एथे होता. शत्रूंनी त्यावर चाल केली होती. बापाच्या मरणाच्या दुसरे दिवशीं बावराने तेथील किल्ला काबीज करून घेतला, व स्वारी करणाऱ्या
 2