या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५४ अकबर बादशहा. प्रसंग आणिला. त्याने ह्या बाबतीत उत्पन्न होणारा विरोध लक्षांत आणून वादाकरितां ह्मणून जो विषय काढला तो हा कीं, राजा हा केवळ प्रजाजनांच्या व्यवहारांतीक ऐहिक विषयांसंबंधींच नायक आहे इतकेंच नव्हे तर धर्मसंबंधी पारलौकिक गोष्टीतही तो त्यांचा गुरु आहे असें मान्य केलें जावें. या मताच्या योगानें “मूले कुठारः " या उक्तीप्रमाणें पेगमबराच्या धर्मांतील आदितत्वावरच प्रहार झाला ; कारण त्या आदितत्वांप्रमार्णे कुराण हा सर्वात श्रेष्ठ कायदा व त्यावर कोणत्याही पौरुषेय नियमांची सत्ता नाहीं. अबुलफझल यानें हा विषय पुढें आणिला, त्यांतील मुख्य खुबी अशी होती कीं, या पूर्वी झालेल्या वादविवादांत मुसलमान विद्वान् पुरुषांचें कुराणांतील निरनिराळ्या वचनांच्या अर्थाविषयींच फक्त नव्हे तर खुद्द पेगमबर जो महमद त्याच्या नीतिविषयीं ही, मतवैचित्र दिसून आकेले होते; तेव्हां मग त्याचें शासन सर्वदा सर्वोसच वंद्य कसे व्हावे ? अबुलफझलच्या या सुचनेपासून उठलेले वादळ भयंकर होतें. महमुदीय धर्माच्या मूलतत्वांचें जें मर्म त्यावरच या सुचनेच्या योगार्ने मोठाच घाला पडला, अर्से ज्यांनीं ओळखिलें नाहीं, असा त्या इबादतखान्यांत एक ही मौलवी अगर पंडित नव्हता. दुसरे जे कोणी विमल दृष्टीचे व शांत विचाराचे पुरुष होते, त्यांचे लक्ष्यांत असें येऊन चुकलें कीं, पूर्वीच्या वादविवादांत केलेल्या विधानांच्या योगानें आपल्या उत्तम धर्माचे व विशुद्ध नीतिशास्त्राचे जबरदस्त परिकोट" ही जमीनदोस्त होऊन गेले आहेत. 66 परंतु जिचा अकबराच्या सत्तेशीं निकट संबंध अशा सूचनेस त्यांच्यानें प्रतिरोध कसा व्हावा? ह्या अडचणीत त्यांनीं एक ठराव केला; त्याला त्यांनी तडजोड असें जरी नांव दिलें तरी, वास्तविकपर्णे, त्यांनी या सूचनेस अनुमोदनच दिलें ह्मणून ह्मणावयाचे. ज्यास ब्लॉकमन साहेबांनी महमुदी धर्माच्या इतिहासांत सर्वांत अत्यंत आश्चर्यकारक असें खरोखर