या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

० .भाग १२ वा. १५५ ह्मटलें आहे असा एक लेख त्यांनी तयार केला व त्यांत कबूल केलें कीं, बादशहा हा न्यायी शास्ता आहे आणि ह्मणून त्याला "मुजताहीद' ह्मणजे पेगमबराच्या धर्मसंबंधी विषयांत निःप्रमादी अधिकारी असा कि- ताब दिला. या कबुलीमुळें अत्रुलफझल यानें योजिलेला हेतु खरोखर सांधला गेला; कारण या कबुलीप्रमाणे या न्यायी राजाची बुद्धि हीच सर्व धार्मिक व इतर नियमांचें मूल स्थान असे ठरलें व धर्माचें बाबतींत अकबराचें शासन आह्नाला शिरसा वंद्य आहे अर्से सर्व मौलवी व मंडळीनी मान्य केलें, व पंडित या अवुकंफझल यानें आपल्या अकबरनाम्यांत अर्से लिहिले आहे की, . लेखाची फलप्राप्ति फार उत्तम प्रकारची झाली. ( १ ) बादशहाचें दरबार हें सर्व धर्मपंथांतील विद्वान व ज्ञानी पुरुषांचें एकत्र जमण्याचें स्थान झार्के ; प्रत्येक धर्मसांप्रदायांतील उत्तम तवें मान्य होऊं लागलीं व त्यांच्यांतील दोषांमुळे त्यांच्या चांगुलपणाकडे डोळेझांक होऊं दिली जात नसे. ( २ ) पूर्ण धर्मस्वातंत्र्य किंवा मुसलमानांचा सर्व धर्माच्या लोकांशीं स्नेहभाव स्थापित झाला. ( ३ ) बादशहाचे हे असे सुनिर्मळ व ( निरपेक्ष हेतु पाहून त्याच्या भोंवतीं कुटिल बुद्धीचे व दुष्ट स्वभावाचे जे लोक होते ते लज्जित होऊन मानहीन झाले. इतर धर्माच्या लोकांचा छळ करण्यास प्रवृत्त असणाऱ्या महमुदीय पक्षांच्या दोघा नायकांनी या लेखावर सही मोठ्या नाखुषीनें केली; पण सही केळी खरी. दुसऱ्या पक्ष, अबुलफझलच्या बापानें, ह्मणजे ज्यानें पेगमबराच्या धर्मातील सर्व भानगडी व त्यांच्या निरनिराळ्या सांप्रदायांतील मूलवचनें अवगत करून घेतली होती, त्यानें या लेखावर मोठ्या उल्हासाने सही केली. इतकेंच नाहीं तर, जास्त असें ही लिहून ठेविलें कीं अशी सुधारणेची प्रवृत्ति प्रचारांत कर्धी येईल व पुढे पाऊल कर्धी पडेल याची आज कित्येक वर्षे मी मोठ्या उत्सुकतेने वाट पहात होतों. या लेखावर सही झाल्यापासून अकबराच्या चरितास नवीन मनु