या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५६ अकबर बादशहा. आला असें ह्यटलें पाहिजे. एकदांचा तो स्वतंत्र झाला. धर्म आणि विचार यांच्या स्वातंत्र्याविषयींच्या कल्पना त्याला अमलांत आणणे आतां शक्य झालें. आतां त्याला आपल्या दरबारांत हिंदु, पारशी, व ख्रिस्तीधर्माचे लोक जमवितां येऊ लागले. फार दिवसांपासून चिति- लेली योजना, कीं एतद्देशीय राजांच्या व आप्रा एथील सार्वभौम बादश- हाच्या हिताहितांचे एकीकरण करावें, ही देखील अमलांत आणण्याचा आतां प्रयत्न सुलभ झाला. वास्तविकपणें अकबराच्या राजवट्यांतील इंग्रजी मॅग्नाचा ( इंग्लिश लोकांस सांप्रत जे राजकीय हक्क स्वतंत्रता प्राप्त झाली आहे जॉन राजाच्या वेळीं त्यांनी तिजपासून झाला आहे. ) पाहिलें असतां, हा लेख सारखी मोठी सनद झाली. मिळाले आहेत व त्यांस जी तिचा उगम मॅग्नाचा नामक मोठी सनद १२३५ साली मोठ्या श्रमानें मिळविली, हा लेख कसा मिळाला, याविषयींचें विवरण सविस्तर केलें आहे त्या- बद्दल वाचक क्षमा करितील अशी उमेद आहे; कारण इतउत्तर जे कायदेकानू झाले व जी राजनीति अंमलांत आळी, तिची सर्व किल्ली या लेखांत सांपडते. त्याच्या योगानेंच मुसलमान धर्मातील संकुचित निर्बंधापासून बादशहा विमुक्त झाला. ह्या लेखामुळे अबुलफझल मोठ्या भाग्योदयास चढला. त्यामुळे त्याला अकबराचा आमरण स्नेह जोडितां आला. इकडे सर्व दुराग्रही मुसलमान मंडळींचा द्वेषानल या लेखामुळे अबुलफझलवर भडकला व त्यामुळे मागील भागांत वर्णिल्याप्रमाणें एका मारेकऱ्याच्या हातून त्याचा खून झाला. नवीन मिळालेल्या अधि- काराचा अकबराने प्रथमतः जो अनेक तन्हेनें उपयोग केला, त्यांत दिवाणी व फौजदारी अधिकाऱ्यांत व त्यांच्या कामांत सुधारणा केली, ही एक विशेष गोष्ट होय. या पूर्वी त्याचे राज्यांतील सर न्यायाधीश एक दुराग्रही सुन्नी होता. तो आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून शिया पंथांतील लोकांचा व मुसलमान ज्यांस पाखांडी ह्मणून मानीत त्यांचा