या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १२ वा. १५७ छलवाद करीत असे. अबुलफझलचा भाऊ फैझी यास त्यानें गांजिलें होतें. या न्यायाधिशास बादशहाने सर्व वरकरणी आदरच करून मक्केस लावून दिलें. आणखी एक मोठा अधिकारी असाच दुराग्रही होता. त्याची ही अशीच उचलबांगडी झाली. व न्याय करितांना धर्मसंबंधी भेदाकडे अगदीं दुर्लक्ष्य केलें पाहिजे आणि सर्व मनुष्यांना, मग ते सुन्नी असोत वा शिया असोत, मुसलमान असोत किंवा हिंदु असोत, सारखेंच लेखीलें पाहिजे. सारांश, दिवाणी अथवा फौजदारी न्यायाधिकाऱ्यांनीं इनसाफाच्या कामांत जाति अथवा धर्म यांकडे बिल- कुल कक्ष देऊं नये असा नियम बादशहाने सर्व अधिकाऱ्यांस घालून दिला. या पुढे शेख फैझी व अबुलफझल हे दोघे बंधु राष्ट्राचे पुनरुज्जीवन व दृढीकरण करण्याचे कामांत बादशहाचे परम विश्वासू असे मंत्री झाले. त्याने या दोघांनाही लश्करी खात्यांत हुद्दे दिले. वजन व प्रतिष्ठा मिळण्यास व ती कायम कारण दरबारांत त्यांना राहण्यास हाच मार्ग उत्तम होता. अकबरानें ज्या अनेक मोहिमा केल्या, त्यांत हे दोघे बंधु त्याच्या समागमें असत. जमीनीवरील सारा व इतर कर यांची पद्धति सुधा- रणाच्या कार्मी ते अनेक सूचना करीत व तसेंच बादशहानें काढिलेल्या विचारांस पाठबळ देण्यास व त्यास सल्लामसलत देण्यास ते नेहमी सादर असत. या सुमारास कालमहात्म्यानुरूप, व त्याच्या अंमलाखालील प्रजा- जनांच्या मतांस रुचेल आणि बहुजनसमुदायास मान्य होईल असा धर्मग्रंथ तयार करून प्रसिद्ध करण्याच्या खटपटीत अकबर होता. य ग्रंथास त्यानें “ दीनी इलाही " अथवा ईश्वरीधर्म असें नांव दिलें. या ग्रंथाचें मुख्य स्वरूप ईश्वर एकच आहे व अकबर हा त्याचा भूलोका- वरील खालीफा ह्मणजे प्रतिनिधि आहे असें आहे. इसलामी प्रार्थना - पद्धति त्यानें मोडून टाकिली. कारण, ती अगदीं संकुचित व अव्यापक