या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५८ अकबर बादशहा. अशी होती. तिच्या ऐवजीं अंतरंगी पारशी धर्माच्या नमुन्यावर, व वाह्य स्वरूपार्ने हिंदूंच्या रीतिरिवाजास अनुसरून अधिक व्यापक अशी प्रार्थना सुरू केली. बादशहानें सरकारी कागदोपत्रीं व त्याप्रमाणेंच आपल्या सणावारासंबंधानें जो नवींन शक चालू केला तो निवळ पारशी लोकांचा होता. या नवीन आचारविचारास मुसलमान लोकांनी उघड- पर्णे प्रतिरोध केला नाहीं. परंतु धर्मसंबंधी प्रकरणांत त्यांच्या मतें बादशहाचा मुख्य सलाहगार जो अबुलफझल त्याजविषयींचा द्वेषानल मात्र त्यांच्यांतील दुराग्रही व सुलभकोपी पुरुषांत कमी झाला नाहीं. या शिवाय, हिंदूराजांच्या नेमणूका लष्करांत मोठमोठ्या हुकमतीच्य व दरबारांत मान्यतेच्या व वजनदारीच्या जागीं होत, ह्याबद्दल तर ही मंडळी अतीशयच मत्सर दाखवी. हे पुरुष, ह्मणजे राणा भगवानदास, मान- सिंग, तोडरमल, व बिरबल इत्यादि, यांचे अंगीं अलौकिक बुद्धिसामर्थ्य होतें, ही गोष्ट या लोकांच्या दृष्टीनें लक्षांत घेण्यासारखीच नव्हती. ते हिंदू; व केवळ हिंदू ह्मणूनच, मुसलमान इतिहासकारास त्यांच्या नांवांचा उल्लेख करण्याचा प्रसंग येई तेव्हां त्यांच्या धर्माविषयीं व त्यांच्या मतें परलोकीं त्यांस जी अधोगति मिळणार तीबद्दल तिरस्कार दाखविल्या- खेरीज राहवतच नसे. या वेळीं पोर्चुगीज लोक गोव्यांत वसाहत करून राहिले होते. त्यांच्या धर्माविषयीं खुलासेवार माहिती करून घेण्याची अकबराचे चौकस बुद्धी इच्छा होऊन त्याने बायबलमधील दुसऱ्या भागाची शुद्धप्रत मिळवून त्याचें फारशींत भाषांतर करावें ह्मणून शेख फैझी यास आज्ञा केली. जेसुईट नामक ख्रिस्तीपंथांतील पाद्री रोडोकफो आक्कानिव्हा या नांवाच्या धर्माधि- काऱ्याचें मन वळवून त्याला आग्र्यास भेटीकरितां बादशाहानें आणविलें. इबादतखान्यांत धर्म या विषयावर जो एक लोकोत्तर वादविवाद झाला तो याच प्रसंगीं. यांत मुसलमान मौकवी व मुलाणे, ब्राह्मण, जती व बुद्धांचे गुरु, निरीश्वरवादी हिंदू, ख्रिस्ती, यहुदी व पारशी धर्म-