या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

> भाग १२ वा. १५९ गुरु या सर्वांनीं पाळीपाळीने भाषण केलें. या प्रसंगाचा वृत्तांत अबुक- फझल यार्ने वर्णिला आहे तो येणेंप्रमाणेः - 'प्रत्येकाने आपआपल्या प्रतिज्ञा व कोटिक्रम निर्भयपणे प्रतिपादन केले. आणि त्यांचे वादविवाद व खंडनमंडनें फार वेळ व मोठ्या कडाख्याचीं अशीं चाललीं. प्रत्येक पंथानें स्वाभिमानाने व अहंकारबुद्धीनें प्रतिपक्ष्यांच्या वचनांवर व कोटिक्रमावर हल्ला करून त्यांचे खंडन करण्यांत होईल तितकी पराकाष्ठा केली. एके दिवशीं रात्रीं, रोडोलफो नामक सर्व ख्रिस्ती पंडितांत शहाणा व चतुर असा वाखाणलेला पाद्री तेथें येऊन इबादतखान्यास नवीन तेज आलें. त्याच्यावर अनेक दुराग्रही व विलक्षण कांक्षेखोर पंडितांनीं आपल्या शास्त्रवचनांचा भडिमार करून हल्ला केला, व परि- षदेस तिचा शांत विचार व न्यायबुद्धि प्रदर्शित करण्याचा प्रसंग आला. विवादकांनीं आपलीं पुरातन ठरीव वचनें पुढें आणिलीं. परंतु निःपक्ष- पातार्ने खरा विचार करून सत्य शोधून काढण्याचा प्रयत्न कोणीही केला नाहीं. यामुळे त्यांच्या शास्त्रवचनांचे खंडन पाद्री यास सहजच करतां आर्के व त्यांस लज्जेनें अधोवदन करण्याचा समय आला. तेव्हां बायबलांत परस्पर विरुद्ध गोष्टी आहेत म्हणून त्यावर त्यांनी हल्ला केला. परंतु त्यांना आपर्के ह्मणर्णे सिद्ध करून दाखवितां येईना, त्या प्रसंगीं त्या ख्रिस्ती धर्माधिकाऱ्यानें, अगदी शांतपणे व स्वतःच्या धर्मावर पूर्ण श्रद्धा धरून त्यांच्या कोटिक्रमास प्रत्युत्तरें दिलीं; व नंतर तो ह्मणाला कीं :- 46 -- ' आमच्या पवित्र शास्त्राविषय या मंडळीचें जर असें मत आहे, आणि फक्त कुराण हेंच कायतें ईश्वरप्रणीत असा जर यांचा समज आहे, तर मग अग्नि सिद्ध करा; मी आमचा धर्मग्रंथ हातीं घेऊन प्रज्वलित झालेला अग्नींत प्रवेश करितों व या विद्वान मौलवीनींही आपलें पवित्र कुराण हातांत घेऊन त्यांत प्रवेश करावा, ह्मणजे मग अग्निशुद्धीनें खरा कोण हैं तात्काल दृष्टोत्पत्तीस येईल." ह्या प्रतिज्ञेपुढे ती कुटिल व हलकी विवादी मंडळी मार्गे हाटकी व " शेषं कोपेन पूरयेत्” या