या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६० अकबर बादशहा. न्यायाने फक्त रागाने शिव्या द्यावयास लागले. हा दुराग्रह क विनयशून्यपणा पाहून निःपक्षपाती बादशहाच्या मनास दुःख झार्के; तेव्हां त्याने मोठ्या शहाणपणाचे व विद्वत्तादर्शक असे पुढील उद्गार काढिले - " अंतरंगी भाव असल्या शिवाय केवळ बाह्यात्कारी धर्माच्या आवाचा व कुराणांतील कोरड्या वचनोक्तीच्या उच्चारण्याचा कांहीं एक उपयोग नाहीं. मीँ आजपर्यंत सत्तेच्या दरानें अनेक हिंदूंस बला- त्काराने माझ्या पूर्वजांचा मुसलमानी धर्म स्वीकारण्यास काविर्के; परंतु, अहंकाररूपीं काळ्या ढगांनीं आणि मताभिमानरूपी धुक्यांनीं तुह्माला अगदीं गुरफाटून टाकिलें आहे, व प्रमाणरूपी दीपांशिवाय एक ही पाऊल पुढें टाकितां यावयाचें नाहीं, अशी आतां सत्याच्या प्रकाशानें माझें अंतःकरण उज्वलित झाल्यामुळे माझी खात्री झाली आहे. निर्मल विचारांनीं जो मार्ग आपण पत्करितों, तोच कायतो हितावह होण्याजोगा आहे. एरव्हीं दिवसांतून पांचदां निमाज पढर्णे, सुंता करणे, अथवा बादशहाच्या सत्तेला भिऊन त्याला साष्टांग नमस्कार घालणें इत्यादि गोष्टी परमेश्वराच्या समोर निरर्थक आहेत. झटलें आहे कीं :- प्रभुचें आज्ञावंदन साष्टांगें ही न होतसे नमनें । सत्याचरण करावें घडत नसे तें कपाळमोक्षानें ॥ या वादविवादाविषयीं व ख्रिस्तीधर्माधिकाऱ्याने सुचविलेल्या अग्नि- शुद्धीच्या कसोटीविपय आपणास कांहींही वाटो पण ह्या वादविवादांत एक आनंदकारक गोष्ट दिसून येते. ती ही कीं, इवादतखान्यांत वाद- विवादाच्या संबंधानें पूर्ण स्वातंत्र्य होतें. याशिवाय अकबराच्या मनाची नैसर्गिक प्रवृत्ति कशी होती हैं ही या गोष्टीवरून व्यक्त होर्ते. खरें हैं कीं, त्यानें सिद्धासिद्ध विचाराच्या योगानें सर्व विशिष्ट मतवादांपासून व धर्मपंथांपासून स्वतःस मुक्त करून घेतलें होतें व ह्या मतवादाच्या व धर्मपंथाच्या ऐवजीं तो सर्व शक्तिमान जगत्कर्ता परमेश्वर यास मात्र मानी, व त्या प्रभूचे जे कल्याणप्रदसंकल्प, कीं धर्मस्वातंत्र्य, न्याय, ०