या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

० भाग १२ वा. १६१ समता व इतरांच्या जीवित्वास धोका बसणार नाहीं असें मात्र आचार- स्वातंत्र्य सर्वास असावें, ते सिद्धीस नेण्यासाठीं आपण स्वतः त्याचा धरातळावर मुख्याधिकारी व प्रतिनिधि आर्हो अर्से तो समजे. मुसल - मान लोकांवर त्याची नजर विशेष करडी होती; कारण इतरजनांचा छलवाद करण्याकडे राज्यकरणाऱ्या लोकांच्या धर्माभिमान्यांची प्रवृत्ति सदोदित विशेष जागृत असते हे त्यास अत्रगत होते. तथापि तो सर्वत्रांचें ह्मणर्णे लक्षपूर्वक ऐकत असे. परमेश्वराचे ठायीं वास करणारे प्रशस्त, उदार, दूरसंचारी, व सर्वव्यापी असे जे गुण त्यांचा प्रत्येक धर्मगुरून विपर्यास केला आहे हें प्रत्येक धर्माचें घातक स्वरूप ध्यानांत आणून, त्यानें या सर्व धर्मगुरूंस एकीकडे ठेवून अखिल जगताचा जो ईश्वर त्यालाच फक्त शरण जाण्याचा निश्चय केला. अकबर झोरोस्ट्रियन म्हणजे पारसिक पंथानुयायी झाला होता असें ह्मणतात. कारण, त्यांचा देव जो सूर्य त्यामध्ये परमेश्वराग्या विद्यमानतेचे चिन्ह आहे असें तो मानीत असे आणि पारसिक पंथां- तील साधेपणा पाहून, तो त्या धर्मास आग़दीं भुलून गेला होता, याविषय बिलकुल शंका नाहीं. त्यानें स्वतः काढिलेल्या धर्मपद्धतींत धर्माधिकारी मुळींच नव्हते. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या सृष्टींत आपण त्याचे प्रतिनिधि आहॊत ह्या दृष्टीनें धर्म हा इतरांच्या छळवादास साधन न होतां सर्वत्रांचे एकीकरणास सहाय्यभूत व्हावा या हेतूनें त्यानें प्रत्येक धर्मातील सार शोधून तें एकवटून एक निराळा धर्मपंथ काढला. त्याच्या राज्यनीतीर्चे धोरण जसें तत्कालीन जनसमुदायांना कळण्या- जोर्गे नव्हतें, त्याच प्रमार्णे त्याच्या धर्मविषयक पद्धतीची व्यापकता ही सामान्य जनांच्या समजुतीच्या आटोक्या बाहेर होती. सर्व दुनियेचे मत आपणासारर्खे करावयाचें ह्मणजे रामराजा मागून दुसरा रामराजाच अवतीर्ण व्हावयास पाहिजे होता. ही गोष्ट " न भूतो न भविष्यति” अशा प्रकारची होती. तेव्हां अखेरीस परिणाम असा झाला कीं, 21