या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६२ अकबर बादशहा. अकबराने उभारलेली राज्यपद्धति त्याच्या मरणानंतर हळू हळू आपल्या संकुचित अशा पूर्वपदास जाऊन मिळाली आणि त्याची धर्मपद्धति तर त्याच्या बरोबरच नष्ट झाली. अकबराच्या मागून दोन मुसलमानच पण धर्माविषयीं बेफिकीर अशा बादशहा नंतर अन्य धर्माच्या लोकांच्या छळवादाचें पुनः एकदां प्राबल्य माजळे, व त्याच्या योगानें त्या श्रेष्ठ व चतुर अकबर बादशहानें ज्या कांहीं कल्याणाच्या ह्मणून गोष्टी करून ठेविल्या होत्या त्या सर्व नाहींशा झाल्या; व त्या घराण्यांतील राज्य- पद्धतीचें जें जिव्हाळ्याचें तत्व त्यास कीड लागून, न्याय, समता, व सर्वत्र आचार व विचार ह्यांच्या स्वातंत्र्याची देणगी हीं जीं अकबराचे राजवट्याचीं अभंग तर्हे, त्यांचे पुनरुज्जीवन करणान्या अशा दुसऱ्या एका राष्ट्राचा अंमल स्थापित होण्याचा मार्ग खुला झाला. वरील निरूपणांत, जेणेंकडून इतरांच्या जीवितास धोका बसणार नाहीं, अशा प्रकारचें आचार व विचार ह्यांचें स्वातंत्र्य अकबराने आपल्या प्रजाजनांस दिलें असल्याचा आह्मी उल्लेख केला आहे. याचें ढळढळीत उदाहरण हें आहे कीं, त्याने हिंदु लोकांतील सती जाण्याची दुष्ट चाल मोडण्याचा प्रयत्न केला. पतीसह स्त्रीनें आपणास दहन करून घेण्याचा विधि ह्मणजे सती जाणें व जी स्त्री याप्रमाणें सहगमन करिते तिचें नांव सती, ह्या गोष्टी वाचकांस अवगतच आहेत. ही चाल इतकी पुरातन व रूढ होऊन गेली होती कीं, उच्च जातींतील कुलीन स्त्रियांनीं सती न जाणे ह्मणजे आपल्या विमल आचरणास आपल्याच हातानें काळिमा लावण्या सारखें होऊन गेलें होतें. पुष्कळ स्त्रिया मोठ्या आनंदानें व उल्हासानें सहगमन करीत. तथापि जिवाचा लोभ अनिवार असल्या- मुळे अनेक प्रसंगीं विधवाजन आपल्या सदाचरणाची खात्री असतांही केवळ काल्पनिक समजाकरितांच आपला बळी देण्यास पराङ्मुख होत, व कर्धी कधीं पतीच्या चितेवर आपला देह दहन करून घेण्याचे नाकारीत. अशा प्रसंगीं सती न गेल्यास परलोकीं भोगाव्या लागणाऱ्या यातनेची भीति