या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १२ वा. १६३ घालून, व सहगमन केलें असतां आपल्या कुलाचा लौकिक वाढेल, वगैरे बोधांची योजना करून धर्माधिकारी अनेक वेळां त्यांचें मन वळवीत व त्यांस सहगमन करण्यास प्रवृत्त करीत. अशा प्रकारची कृत्यें अकबराच्या दयार्द्र व कोमल अंतःकरणास तिटकारा आणणारी होतीं. तेव्हां या चालीचा बीमोड करण्याकरितां त्यानें होती नव्हती तितकी पराकाष्टा केली. राजस्थानांत या चालीचें प्राबल्य फारच होते. परंतु अकबराचा रजपूत राजांश असा संबंध होता की, सहगमन करण्याची ज्या गतभर्तृकेची मनापासून इच्छा असे तीस ही प्रतिरोध करण्यापुरतें त्यांच्या धर्मसंस्कारांच्या व पुरातन व संमानित अशा चालींच्या आड त्याच्यानें जाववलें नाहीं. त्याला असें वाटलें कीं, ही चाल बंद करण्याचा हुकूम सोडण्यापूर्वी राजस्थानांतील राजवाड्यांच्या अंतर्यामीं ही, आपण ज्या उदार तत्वांची स्थापना करणार त पोहचून भिनून जाण्यास कांहीं काळ जाऊं दिला पाहिजे. तथापि गतभर्तृकेनें सहगमन करण्याची यत्किचित् ही नाखुशी दाखविली असतां, तिला बळी देण्याची मनाई आहे, असा त्यानें हुकूम फरमाविला. या संबंधी नुसते कागद कायदे करून अकवर स्वस्थ राहिला असें नाहीं. एके प्रसंग, अकबर अजमीरांत असतां त्याचा विश्वासूक प्रतिनिधि राजा जैमल, अंबरचा राणा राजा बिहारीमल याचा पुतण्या, बंगाल्यांत तेथील अमीर उमरावांशीं बोलर्णे चालविण्यास गेला होता तो चौसा येथें मरण पावल्याची बातमी येऊन पोहोंचली. जैमल हा अकबराच्या अगर्दी खास मर्जीतील होता. कारण राजस्थानांतील जे राजे अकबराची भेट घेण्याकरितां आले होते, त्यांत पहिल्यानदां हा आला, व तेव्हांपासून पुढे, त्यार्ने मोठ्या इमानार्ने व राजनिष्ठतेनें नोकरी बजाविली होती. जोधपूरचा राजा' राणा उदेसिंग याच्या मुलीशीं त्याने लग्न केलें होतें. ही राजकन्या फार दृढनिश्चयी होती. तिचा भर्ता मरण पावल्याची खबर अंबरास येऊन पोहोंचली, तेव्हां सहगमन करण्याचे तिर्ने स्पष्ट-