या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६४ अकबर बाद शहा. पर्णे नाकारिलें. बादशहाचे हुकुमाप्रमार्णे तिला आपले विचारानुरूप वागण्याचा पूर्ण हक्क होता. त्यास अनुसरून त्या साध्वीनें सती जाण्याचें नाकारिलें. तेव्हां लागलींच जिकडे तिकडे ' अब्रह्मण्यं, अब्र- झण्यं' ह्मणून कन्होळ उठला, त्यांत तिचा प्रत्यक्ष मुलगा राणा उदेसिंग हा पुढारी होता. हा कल्होळ शेवटीं इतका माजला कीं त्या साध्वी बलात्कारानें उचलून पतीच्या चितेवर नेऊन ठेवण्याचा तेथील मंड- ळींनीं निश्चय केला. सुदैर्वे करून अकबरास ही बातमी समजली व त्याने हा बलात्कार निवारण्याचा निश्चय केला. त्याने या काम, नियोजिलेले अधिकारी अगदी ऐन वेळीं येऊन दाखल झाले. त्यांमध्ये खुद जैमलचा चुलता होता. ते पोहोंचले त्या वेळीं चिता देखील पेटलेली होती. जैमलच्या चुलत्यानें चाल करून उदेसिंगास पकडले, तेथें जमलेल्या लोकांस हाकून लाविलें, व त्या बिचाऱ्या राणीचा जीव वांचविला. विद्वान् व उदार अंतःकरणाचे मित्र शेख फैझी व अबुलफझल यांवर अकबराची अत्यंत भक्ति होती खरी. तथापि जे जे ह्मणून विद्येविषयीं खरी अभिरुचि दाखवीत, व ज्ञानार्जनाची खरी लालसा प्रकट करीत, त्या सर्वांना तो आश्रय देई. ढोंग व दंभ यांचा त्यास तिटकारा असे. आपल्या दरबारांतील विद्वान् मौलवींच्या कृतींत व वचनांत हे दुर्गुण पूर्णपर्णे वसत आहेत, असें त्यास लवकरच कळले. त्यांचे गुह्य कळ- ल्यावर अकबरास त्यांचा वीट आला, व त्यांचें दंभ बाहेर काढण्यास होते नव्हते ते प्रयत्न करण्याचा त्यांर्ने निश्चय केला. प्रोफेसर ब्लॉकमन-आईन ए अकबरीर्चे इंग्लिश भाषांतरकार-यांन अर्से किहिलें आहे कीं, “गर्व व अहंकार यांस अकबराजवळ क्षमा ह्मणून नसे; व सर्व अहंकारांमध्ये मिथ्या विद्वत्तेच्या अहंकाराचा तो अतिशय तिरस्कार करी." ह्मणून त्याच्या ह्या वर्तनानें दुखावलेले लोक अकबर विद्व- सेवा व विद्वान लोकांचा अव्हेर करितो अशी हाकाटी करीत. वस्तुतः, त्यानें