या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १२ वा. १६५ असें कांहींच केळे नाहीं. इतकेंच नाहीं तर, खऱ्या विद्येचा त्याच्या सारखा उदार पुरस्कर्ता या भरतखंडांत आजपर्यंत दुसरा कोणी झाला नाहीं. या बाबतीत सांप्रतच्या राज्यकर्त्यांनीं त्याचा कित्ता गिरविल्यास फायदा होण्याजोगा आहे. त्या काळीं, जे अनेक विद्वान् व शोधक बुद्धीचे लोक होऊन गेले, त्यांत खानईअझम मिरझा नांत्राचा अकबराचे एका आवडत्या धात्रीचा मुलगा होता. इतिहास शास्त्रांत पारंगत झालेला याचे सारखा दुसरा ते वेळेस नव्हता. पुष्कळ दिवसपावेतों आपल्या पुरातन परंपरागत पंथास चिकटून राहून अकबरानें नवीन सुरू केलेल्या धर्ममार्गाचा त्याने उपहास मांडला होता. फैझी व अबुल- फझल यांची तर त्याने थट्टा करावी आणि दांभिक व ढोंगी या अर्थाची त्यास निंदासूचक नांवें ठेवावी. परंतु पुढें कांहीं काळानें तो मक्केच्या यात्रेस गेला तेव्हां तेथील इमाम मंडळींनीं दानधर्म करविण्याच्या मिषानें त्यास इतके बुचाडून टाकिलें कीं, पेगमबराच्या धर्माविषयीं त्याची भक्ति न कळतां हळू हळू अगर्दी कमी झाली. नंतर यात्रा उरकून आग्र्यास परत आल्यावर, तो दिवाणी इलाही अथवा अकबराने नवीन सुरू केलेल्या ईश्वरीपंथाचा अनुयायी झाला. कविता रचण्याची हातोटी त्यास चांगली साधली होती. त्याची बुद्धिमत्ता व भाषणपटुत्व हीं अलौकिक होतीं. त्यानें रचिलेले अनेक चुटके होते त्यांपैकी एक आजमितीपर्यंत लोकांत प्रसृत आहे. तो असा "मनुष्याला चार बायका असाव्यात. इराण देशची, घरांत कोणी बोलण्याचालण्यास हवी ह्मणून; दुसरी, घरां- तील काबाडकष्ट करण्याकरितां पाहिजे ती खोरासन प्रदेशांतील; तिसरी, मुलेबाळें संभाळण्याला हिंदु जातीची, व या तिघींस ही धाक बसावा या करितां हमेश कोरडा चालविण्याला कोणी तरी हवी, म्हणून चवथी तुर्कस्थानची. " एक अकबराचा पुरातन अतालिक किंवा गुरु बैरामखान याचा मुलगा • मिरझा अबदुरहीम हा सर्वात अति रणशूर योद्धा असून फारच दिलदार