या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६६ पुरुष होता. अकबर बादशहा. अकबराच्या राज्यांत दीर्घकालपर्यंत खानखानानचा झणजे अमीरांच्या अमीरांचा, अर्थात् मुख्य सेनाधिपतीचा अधिकार त्याज- कडे होता. त्याची विद्वत्ता त्याच्या रणवीरते इतकीच मोठी होती. 'तुर्की भाषेत लिहिलेल्या, व्यवहारज्ञानाचा संग्रह ह्मणून ज्याचें अबुल फझल यानें यथायोग्य वर्णन केलें आहे, त्या बाबरच्या चरित्राचें भाषांतर त्याने त्या वेळीं दरबारांत चालू असलेल्या इराणी भाषेत करून, तो ग्रंथ अकबरास नजर केला. बाकीच्या ग्रंथकारांत खाली लिहिलेले इतिहास- कार सुप्रसिद्ध आहेत --- ( १ ) इतिहासकार निजाम उद्दीन अहमद; यानें तत्राक तई अकवारी अथवा अकबराच्या वादशाहीचें दप्तर या नांवाचा इतिहास लिहिला आहे. (२) तारीखीई आलफी अथवा पेगमबर पंथाचा सहस्रसांवत्सरिक इतिहास याचे कर्ते, व ( ३ ) या सर्वाहून विश्रुत असा जुन्या पंथाचा इतिहासकार अबुल कादर बदौनी, ज्यानें तारिख ई बदौनी अथवा बदौनीकृत इतिहास या नांवाची बखर लिहिली व काश्मीरचा इतिहास शोधून प्रकाशित केला. नी हा मोठा अलौकिक पुरुष होऊन गेला. तो अकबरापेक्षां दोन वर्षांनी वडील होता. त्यानें अगर्दी बाळपणापासून तत्कालीन अति प्रसिद्ध व धर्मशीळ पुरुषांजवळ, निरनिराळ्या शास्त्रांचें अध्ययन केलें होतें. गायन कलेत, इतिहासांत, व ज्योतिषशास्त्रांत त्यानें अली- किक प्राविण्य संपादिलें होतें. त्याचा कंठ मधुर होता, ह्मणून अक- रार्ने त्याला आपल्या दरबारचा दर शुक्रवारी काम करणारा इमाम नेमिलें. दरबारांत शेख मुबादिक व त्याचीं मुलें फैजी यांच्या समागमांत बदौनीनें चाळीस वर्षे घालविलीं. आणि अबुलफझल परंतु इतक्या अव- धींत त्यांच्यांत खरा स्नेहभाव ह्मणून उत्पन्न झाला नाहीं; कारण बदौनी हा जुन्या पंथाचा मुसलमान होता, व तो त्यांना नेहमीं पाखांडी समजत असे. अकबराच्या सांगण्यावरून त्यानें रामायणाचें व त्याचप्रमाणे महा- भारतांतीक कांहीं भागांचें, संस्कृतांतून फारशींत भाषांतर केलें. त्याचा