या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १२ वा. १६७ वर सांगितलेला ऐतिहासिक ग्रंथ तारीख ई बदौनी हा मुनतरखत्रत उलत वारिख अथवा प्रतिवार्षिक वृत्तांतांतील वेंचे या नांवानें कांहींसा जास्त विश्रुत आहे. या ग्रंथांत अकबराचीं धर्मसंबंधी मर्ते कशीं होतीं, यार्चे सविस्तर वर्णन असून त्याच्या बादशाहींत जे जे प्रख्यात पुरुष होऊन गेले त्यांची चटकदार चरित्रे दिलीं आहेत; व यामुळेच त्या ग्रंथास विशेष मातवरी आलेली आहे. अकबर बादशहाच्या मरणापूर्वी सुमारें अकरा वर्षे, वदौनी मरण पावला. व त्याचा मोठा ऐतिहासिक ग्रंथ जाहानगीर बादशहा गादीवर बसल्या नंतर कित्येक दिवसपर्यंत प्रगट झाला नव्हता. कारण, त्यानें तो मोठ्या खबरदारीनें गुप्त ठेविला होता. अकबराने सुरू केलेले नवीन सांप्रदाय ज्यांना नापसंत होते अशा दुराग्रही मुसलमानांना हा ग्रंथ फारच प्रिय झाला. आणि पुढे, हे चालू केलेले सांप्रदाय जसजसे हळूहळू नाहींसे होत चालले व विचार स्वातंत्र्याचा नाश होऊन परधर्मीयांचा छळवाद करण्याची पुनः प्रवृत्ति सुरू झाली, तसतसा हा ग्रंथ अधिका- धिक लोकप्रिय झाला. अकबर बादशहाच्या वेळच्या इतिहासादि साहित्यविद्या वैभवांत ज्यांनीं आपल्या बुद्धीनें, उद्योगानें, व विद्वत्तेनें भर घातली, अशा कित्येक पुरुषांची माहिती येथें नमूद करणे फारसे जरूर नाहीं. अजरामर होऊन बसलेल्या आईन-ए-अकवारींत या एकंदर लहान मोठ्या पुरुषांची संपूर्ण यादी दिलेली आहे. तथापि खुद बादशहानें अनेक कलांस व विद्यांस प्रोत्साहन कोणत्या प्रकारें दिलें, याविषयीं दोन शब्द लिहिणें युक्त आहे. आपल्या राष्ट्राबाहेरून संपादिलेल्या, व हिंदु ग्रंथांचा, व त्यांच्यापैकीं पुष्कळांचे फारशीत भाषांतरें करवून त्यांचा आपल्या पुस्तकालयांत संग्रह करण्याकडे अकबराचे फार लक्ष होतें असें दिसतें. या पुस्तकालयाचे कित्येक भाग केलेले असत असें आईन-ए-अकबरीच्या कर्त्यानें ह्यटलें आहे. “ पुस्तकें अंतःपुरांत ठेविलीं आहेत व कांहीं त्याच्या बाहेर ठेविलीं आहेत. कांहीं