या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६८ अकबर बादशहा. पुस्तकाच्या मातबरीप्रमार्णे व ग्रंथांत विवरण केलेल्या शास्त्राच्या योग्यतेनुरूप पुस्तकालयाच्या प्रत्येक भागाचे प्रतिविभाग केलेले आहेत. गद्यग्रंथ, काव्यें, हिंदी, पर्शियन, ग्रीक, काश्मिरी व अरबी ग्रंथ गिरनिराळे ठावले आहेत, व त्यांची पहाणी याच क्रमानें होत असते. अनुभविक लोक दररोज नवीन नवीन पुस्तकें आणितात, व तीं हुजूरांस वाचून दाखवितात. हुजूर प्रत्येक पुस्तक अथपासून इतिपर्यंत लक्षपूर्वक श्रवण करितात .. वाचून दाखविणारे लोक ज्या पानावर दररोज थांबतात, त्या ठिकाणीं हुजूर लेखणीनें निशाणी करितात; व त्यांनी जितकीं पृष्ठे वाचिलीं असतील, त्या मानानें त्यांस रोख मोहरा व रुपये देऊन त्यांची संभावना करितात. हुजूरच्या दरबारांत प्रसिद्ध ग्रंथांपैकीं ज्यांचे वाचन झालें नाहीं असे नामांकित ग्रंथ फारच थोडे असतील. दुसरे, सर्व निःपक्षपाती ज्ञाननिष्ट पुरुषांचे अग्रणी असे ने हुजूर त्यांस अपरिचित अशा गतकालीन ऐतिहासिक गोष्टी किंवा शास्त्रांतर्गत कौतुकें अथवा तत्वज्ञानांतील चित्त वेधणारी प्रकरणें, ह्रीं क्वचितच असतील" याप्रमाणे अकबरच्या . ग्रंथाभिरुचीचें वर्णन करून आईनईकाराने त्याला विशेष प्रिय असलेल्या ग्रंथांची लांबच लांब यादी दिली आहे. यापैकीं, कित्येक ग्रंथांचा मागील पृष्ठांत उल्लेख करण्यांत आला आहे. विद्या व विद्यासंपन्न जन यांजपासून या राजवट्याच्या वृत्तांतावर झालेल्या परिणामांचें वर्णन आतां पुरेसें झालें आहेसें वाटतें. विशेषतः, फैझी व अबुलफझल या उभयतां बंधूंचे वजन त्यांच्या हयातीत एकसारखें कायम राहिलें, इतकेंच नाहीं, तर अबुलफझलचें वजन त्याच्या मरणानंतर ही कित्येक दिवस कायमच होतें. त्यानें अकबराला केलेल्या उपदेशांनी त्याच्या नैसर्गिक वृत्तीस दृढता आणिली. होतीं तींच अकबराच्या स्वभावास प्रिय या बंधुद्वयांना जीं तवें प्रिय अशीं होतीं. तीं तत्वें येणें प्रमार्णैः- ( १ ) धर्मा संबंधींचे स्वातंत्र्य पूर्णपणे राहूं देणें; ( २ ) जाति आणि धर्म व सांप्रदाय हे लक्षांत न आणितां सर्वत्रांस सारखा न्याय