या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७० अकबर बादशहा. करण्याचें आतां आह्मी योजिले आहे. "मी. आपल्या राजवय्यांत एकेकाळीं हिंदूंना जबरदस्तीनें पेगमबराची दीक्षा दिलेली आहे, " या अर्थाचें अकबराने प्रदर्शित केलेल्या उक्तीचें अवतरण या भागांत मार्गे एके ठिकाणी दिले आहे. ही गोष्ट खरोखरीच घडली असली पाहिजे ; कारण अकबराने ती स्वतः सांगितलेली आहे. परंतु अशा जबरदस्तीनें दीक्षा दिल्याबद्दलचा दाखला इतिहासांत कोठें सांपडत नाहीं. अकबर कहान असतां बैरामखान मुख्य सत्ता चालवीत होता, तेव्हां या गोष्टी घडून आल्या असाव्यात. राजवेत्र आपल्या हातीं घेतल्यापासून, ह्मणजे तोपर्यंत सर्वात प्रबळ होऊन बसलेल्या बैरामखानाला मक्केस जाण्याची रजा दिली त्या दिवसापासून - जातिभेद मनांत न आणितां हिंदू व मुसल- मान या उभयतांना समदृष्टीने आपल्या चाकरीत घेण्याचा जो आपला हेतु त्यानें जाहिर केला, त्यापासून तो कधींही तिळमात्र सुद्धां ढळला नाहीं. जिंकणाऱ्या पक्षाच्या सैनिकांनीं पराजित झालेल्या शत्रूंच्या बायका मुर्ले व आश्रित यांना जबरदस्तीनें, विकावें, अथवा गुलाम करून टाकावें, अशी जी आजपावेतों वहिवाट चालत आली होती ती अकबरानें आपल्या राजवट्याच्या सातवे वर्षी ह्मणजे वयाच्या एकविसावे वर्षी मोडून टाकिली. शत्रूंचे कांहींही अपराध असोत पण बादशहाने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्याप्रमाणे त्यांच्या मुलांमाणसांना व आश्रितांना त्यांच्या इच्छेनुरूप स्वगृहीँ अथवा आप्तवर्गाच्या घरी जाण्याची पूर्ण मुभा असे. लहान असो अथावा थोर असो गुलाम ह्मणून कोणास करावयाचें नाहीं. 'नवरा दुर्वतनी असला तर त्यांत त्याच्या विचाऱ्या बायकोचा क 66 अपराध आहे ? व बाप बंडास प्रवृत्त झाला, तर त्याबद्दल त्याच्या मुळा- कडे कसा दोष येईल?" अशी त्या उदार बुद्धीच्या बादशहाची विचार- सरणी होती. राज्यव्यवस्थेत जीं कांहीं अवांतर दोषस्थळे होतीं त्यांच्या निरसनार्थ हेंच उदार व दूर दृष्टीचें धोरण त्याने मोठ्या उत्साहानें सतत चालू