या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १२ वा. १७१ 0 ठेविलें. कारभार हातीं घेतल्यापासून दुसऱ्याच ह्मणजे आपल्या राज- वट्याचे आठवे वर्षी, अकबरानें एक पुरातन काळापासून चालत आलेला कर उठविण्याचा निश्चय केला. या करार्चे उत्पन्न जरी फार जबर होतें, तरी तो आपल्या हिंदू प्रजेच्या अंतःकरणास अन्यायकारक व विचारस्वातंत्र्यास बाधक वाटणारा आहे, असें त्याच्या मनानें घेतलें होतें. हिंदू लोकांसारखी यात्रा करण्याविषयींची आसक्ति जगांतील - दुसऱ्या कोणत्याही लोकांस नाहीं. साधुमाहात्म्य व स्थानमहात्म्य यांबद्दल नावाजलेलीं त्यांचीं पुण्यस्थळें हरएक प्रांतांत जागोजागी आहेत. यात्रे- करू लोकांना अनेक प्रसंगीं दूरदूरचे व कंटाळवाणी प्रवास करावे लाग- तात. किंबहुना, जितकी दूरची यात्रा तितकी जास्त पुण्यप्राप्ति, अर्से प्रमाण असतें. मोंगलापूर्वी होऊन गेलेल्या अफगाण बादशहांना या यात्रा ह्मणजे एक विपुल व सतत वाहणारा असा उत्पन्नाचा झराच आहे असे वाटत होतें. ह्मणून त्यांनीं सर्व यात्रेकरूंवर, त्यांच्या अजमाव - केल्या ऐपतीप्रमाणे अथवा लौकिकाप्रमाणे कर बसविला होता. अबुलफझल यानें असें लिहिलें आहे कीं, हा कर मोठ्या किफाय तीचा होता; त्यापासून सालिना कोट्यावधि रुपयांचे उत्पन्न होई. परंतु लोकांस तो फार क्लेशप्रद असा वाटे. हिंदूंच्या दृष्टीनें यात्रा ह्मणजे बहुतेक धर्माने किंवा धर्माचा अर्थ करून सांगणाऱ्या ब्राह्मणांनीं निवे- दिलेले एक अवश्य कर्तव्य होय. यात्रेकरू आपल्या देहास अति मोठ्या अडचणी भोगावयास लावितो व नमस्कार किंवा कोटांगणें घाळीत शेंकडों कोस जातो, ह्मणून सरकाराने त्याला कां बुचाडावें असा प्रश्न हिंदुलोक करीत. हे त्यांचे विचार लवकरच अकबराच्या कानाप- र्यंत जाऊन पोहचले. इकडे त्याच्या दरबारांत हा कर ह्मणजे महसु- ळाचा एक अनायासाचा झरा आहे येवढ्याच गोष्टीकडे लक्ष देणाऱ्या मुत्सद्यांनी बादशहास असें प्रतिपादन केलें कीं, यात्रा करणें हा पोकळ 'धर्मभोळेपणाचा अत्याचार आहे; व हिंदुलोक तो कदापि ही सोड-