या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७२ अकबर बादशहा. णार नाहींत ; तेव्हां या कराची वसूली खात्रीची आणि सततची अशी आहे; करितां तो उठविणें ह्मणजे एक वसुलाच्या बाबतींत नुकसानीची मसलत आहे. यावर बादशहानें प्रत्युत्तरादाखल असा बुद्धिवाद केला कीं, जनसमूहाच्या अत्याचारावर हा कर आहे; व यात्रा न करितां घरीं बसणाऱ्या हिंदूंना तो चुकवितां येण्याजोगा आहे, हें जरी मान्य केलें, तरी, ज्या अर्थी यात्रा करणें हा हिंदुधर्माचा एक भाग बनला आहे, व एका अर्थी त्यांनीं तो ईश्वरोपासनेचा एक प्रकार मानिला आहे, त्या अर्थी, अशा ईश्वरप्रणीतविधि ह्मणून मानिलेल्या कर्मात काडी इतकीही आडकाठी आणणें अन्यायाचें आहे. तो कर शेवटीं त्यानें अजीबात बंद केला. याचप्रमार्णे मुसलमान बादशहांनीं परधर्मी लोकांवर जिझिया अथवा प्रत्येक माणसावर डोईकर बसविला होता, तो ही बादशहानें रद्द केला. प्राचीनकाळीं हिंदुस्थान जिंकणाऱ्या अफगाण बादशहांनीं हा कर बस- विलेला होता. कर देणाऱ्या लोकांत याच्या योगानें जसें वैमनस्य उत्पन्न झालें तसें दुसऱ्या कोणत्याही करानें झार्ले नसेल. तसेंच प्रजापीडन करण्यास या करामुळे जशी सवड सांपडली, तशी दुसऱ्या कोणत्याही करानें सांपडली नसेल. अकबरापूर्वी होऊन गेलेल्या बादशहांना या देशांतील रहिवाशांची सहानुभूति संपादितां आली नाहीं, याचें कारण हा कर वसूल करणाच्या हकीकतीकडे नजर दिली असतां कळण्याजोगें आहे. यासंबंधानें, तारीख ई फिरूझशाही नांवाच्या इतिहासकारानें लिहिलें आहे कीं “दिवाणीच्या तहशीलदारांनीं हिंदुलोकांना या कराची वसूली मागितली असतां, त्यांनीं त्याची आदाई मोठ्या नम्रतेनें व दीनतेनें केली पाहिजे; व या अंमलदारांना त्यांचे तोंडांत थुंकावेंसें वाटल्यास आपण बाटून जाऊं याची यत्किंचितही भीति मनांत न आणितां त्यास थुंकतां यावें ह्मणून त्यांनीं कागलींच आ केला पाहिजे. या अवहेलनेचा व तोंडांत थुंकण्याचा हेतु हा कीं, खऱ्या धर्माची ह्मणजे