या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग २ रा.

११

क्यांत त्याच्या राज्यावर शत्रूंनीं हल्ला करून तें जिंकिलें; ह्मणून तो माघार घेऊन आपली जन्मभूमि जें केश शहर तिकडे वळला. संकटाचे अनेक प्रसंग येऊन गेले व देवाशीं बऱ्याच झटापटी झाल्या. शेवटी, बाकी राहिलेल्या थोड्याशाच अनुयायांसह समरकंदावर पुनः एकदां एकदम न कळत छापा घालण्याचा बाबर यार्ने निश्चय केला. ही स्वारी फारच धिटाईची व धोक्याची होती; कारण, त्याचें एकंदर सैन्य कायतें २४० लोकांचें होतें. त्यार्ने पहिला यत्न केला तो फसला; पण पुनः यत्न केला त्यास यश आलें. बाबर अगदी ऐन वेळेस जाऊन पोहचला होता; कारण तटांतील शेवटच्या जिवंत असलेल्या शिपायानें हात टेकले व न टेकले, इतक्यांत युझवेकांचा सरदार अघाडीच्या सैन्याच्या शिरोभागीं समरकंदवरच दौड करीत येतांना दिसला. त्यास अर्थातच हार खाऊन माघारें जावें लागलें.
अशा रीतीने मिळविलेलें समरकंद शहर बाबर यास फार वेळ राखतां आर्के नाहीं. पुढील वसंतांत युझवेक लोकांर्चे मोठें सैन्य पुनः आर्के. त्यांचा मोड करण्याकरितां शहराबाहेर बुखान्याच्या रस्त्यावर जिंकण्यास कठिण अशा ठिकाणीं बाबर यार्ने तळ दिला. त्याचे सैन्याचे उजवे अंगास कोहिक नांवाची नदी होती. त्यामुळे तिकडून फारसें भय नव्हते. या ठिकाणींच तो शत्रूची वाट पाहात राहता तर कदाचित् त्यानें त्यांस हांकून लाविलें असतें. कारण तें ठिकाण इतकें मजबूत होतें कीं, हल्ला करून तें सर करतां येईल असा संभव नव्हता. परंतु, युझबेक लोकांच्या सैन्यावर हल्ला करण्याकरितां तेथून पुढे जाण्यास एका ज्योतिष्याने बाब- रार्चे मन, त्यास स्वतः तसें करणें बरोबर नाहीं असें वाटत असतां, वळविलें. यानंतर जी लढाई झाली तींत प्रथमतः बाबरास बहुतेक जय मिळाला, पण अखेरीस त्याचा पराभव झाला व तो सैन्यासह शहराचे तटाचे आंत पांच महिनेपर्यंत तो तेथें टिकाव धरून राहिला. माघारा गेला. पण दुष्काळामुळे त्यास शेवटीं हार खावी लागली. समागमें असलेल्या