या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १२ वा. १७३ पेगमबर पंथाची प्रतिष्ठा वाढवावी, खोट्या धर्माची परिभावना करावी, च आपल्या संरक्षणाखाली असलेले काफर लोक आपल्या अर्ध्या वच- --नांत कसे वागतात हे जगास जाहीर करावें. " • अधिका-यांचे आचरण पेगमबर धर्माच्या खऱ्या याप्रमाणे वागणाऱ्या तत्वाविरुद्ध होतें हैं .. सिद्ध करून दाखविण्याचें प्रयोजन नाहीं. दुराग्रही धर्माभिमान्यांच्या अमर्याद आस्थेमुळे ज्याची हानि झाली नाहीं, असा दुनियेत धर्मच नाहीं ; आणि या कारणाने निदान इतर धर्माइतकी तरी मुसलमान धर्माची हानि झाली आहे यांत संशय नाहीं. तथापि फिल्झशाहासारखा लोको- तर सुज्ञ व समंजस बादशाहा दिल्लीच्या तक्तावर विराजमान असतां, आपल्या वर्तनार्ने धर्माचा केवळ विपर्यास करणारे अशा कारभारी लोकांना, जिंकिलेल्या प्रजाजनांस धर्माच्या नांवावर, जुलूम करण्याची व निर्भ- र्त्सना करण्याची केवढी सवळत होती, हें वरील अवतरणावरून शाबीत होतें. अशा प्रकारचा कर वसूल करण्यांत अधिकाराचा दुरुपयोग होण्याचा निसर्गत:च संभव आहे ; इतकेंच नाहीं, तर हा करच मूळ दोषार्ह आहे, हेंही अकबरास समजून चुकलें ; काफर ह्मणजे नास्तिक हा नुसता शब्द देखील उपयोगांत आणिलेला त्या उदार अंत:करणाच्या बादशहास सहन होत नसे. कारण तो नेहमीं ह्मणे “आपण ह्मणतों तेंच खरें असा जिम्मा द्यावा तरी कोणी?" हरएक धर्मांत कांहींना कांहीं श्रेय आहेच; तेव्हां कोणत्याही मनुष्यार्ने मनोभावानें उपासिलेल्या धर्मावर कर बसवि- ण्याची त्याची इच्छा नसे. यामुळे, आपल्या राजवट्याच्या आरंभ, ह्मणजे तक्तावर विराजमान झाल्यापासून नववे वर्षी, आणि वयाच्या तेविसावे · वर्षी, – त्याचप्रमार्णे लक्षांत ठेवावयाचें कीं प्रख्यात बंधुद्वय फैझी व अबु- लफझल यांचा समागम जडून त्यांनीं उपदेशिलेल्या ज्ञानाचा पगडा - बसण्यापूर्वी तीन वर्षे केवळ स्वतःच्याच योग्यायोग्य विचारबुद्धीनें अक- बरानें आज्ञापत्र जाहीर करून हा कर अजीबात उठविला. तेव्हां-