या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७४ अकबर बादशहा. पासून धर्माच्या बाबतींत अनाद्यनंत परमेश्वरापुढे सर्व लोक सारखे झाले. हिंदुप्रजेश अकबर बादशहाचा जो व्यवहार होता तो फक्त त्यांच्या धर्मसंबंधी करांर्चे निर्मूलन करण्यापुरताच होता असें नाहीं. प्रजाज- नांर्चे कल्याण व सुखसंपदा यांच्या आड येणाऱ्या गोष्टी नाहींशा कर- ण्याच्या कामी त्यानें आपल्या अधिकाराचा, यत्किंचितही दम न दाख- वितां, अश्रांत खटपट केली. सती जाण्याची क्रूर चाल बंद करण्या- करितां त्यानें जे प्रयत्न केले त्याचा उल्लेख पूर्वीच केला आहे. सतीश ज्याचा अगर्दी निकट संबंध आहे, असा जो विधवा - पुनरुद्वाहाचा प्रचार तो सुरूं करण्यास ही अकबराच्या हातून उत्तम प्रकारचें उत्तेजन मिळाले. या बाबतींत तो एक पाऊल पुढे ही गेला. विधवेचा पुनरुद्वाह कायदे- शीर आहे, असें आज्ञापत्र काढून त्यानें चोहोंकडे प्रसिद्ध केलें. हिंदुलो- कांत फार प्राचीनकाळापासून वधुवरें वयांत येण्यापूर्वी लग्न करण्याची वहिवाट पडून गेली आहे; व जी सध्यांच्या मोठमोठ्या शाहाण्या पुरुषांन तत्वदृष्ट्या निषेधिली असतां ही, सांप्रत सुरू आहे, ती बंद करण्याचा ही त्यानें हुकूम दिला. याचप्रमाणें बळी ह्मणून पशुवध करण्याची व दिव्य* करवून इनसाफ करण्याची त्याने मनाई केली. इकडे आपल्या धर्मो- तील लोकांशी ही त्यांचें वर्तन कमी कडकपणाचें होतें असें नाहीं. मात्र अमुक गोष्ट करा, किंवा, करूं नका, असा स्पष्ट हुकूम न करितां आपल्या स्वतःच्या वर्तनाचा कित्ता दाखविणें, त्यांचें मन वळविणें, व कधीं कधीं त्यांची कानउघाडणी करणें ह्या मार्गाचा, त्यानें त्यांच्याश वागण्यांत, स्वीकार केला.

  • एखाद्या मनुष्यावर आरोप आला असतां त्यांतून मुक्त होण्याचा दिव्य करणें हा एक मार्ग होता. आरोपितानें किंवा आरोप आणणा-या तप्त हातीं घ्यावें अगर तप्त तैांत हात घालावा व त्यास त्यामुळे इजा न झाल्यास त्याचा पक्ष खरा आहे, असें मानण्याचा संप्रदाय होता. हा प्रचार तीन शतकांपूर्वी यूरोप खंडांत, व खुद्द इंग्लंदांत ही जारी होता असें इतिहासावरून कळतें.

0