या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १२ वा. १७५ ईश्वरोपासना, उपवास दानधर्म व यात्रा इत्यादि गोष्टी त्यानें मना केल्या नाहींत. तथापि त्या बेसुमार होऊं लागल्यास तो त्यांचा निषेध करी. या बाबतींत, व्यक्तिपरत्वें भिन्न रुचि असण्याचा संभव आहे. तथापि लोकांस धर्माचा बाणा दाणविणे, हें बहुतेकअंश दांभिकपणाचे एक पांघ- रूण आहे व दीर्घकाल नाक धरून न बसतां व जोग्याचें रूप धारण न करितां जीवित्वाचें सार्थक करण्याचे अनेक मार्ग आहेत, हें व्यास समजून चुकलें होर्ते. अकबरास मुसलमान लोकांना सुंता करण्याची पूर्ण मनाई तर करितां येईना; तथापि त्याने अशी ताकीद दिली कीं, हा विधि मुलांना- बारावें वर्ष लागेपर्यंत करूं नये. हिंदु लोकांचा संतोष राखण्याकरितां त्यानें गोवध बंद करण्याचा निग्रह केला. दुसरे पक्ष, सूकरवध व त्याचें मांस भक्षण हें सशास्त्र आहे, असें त्यानें सर्वत्र जाहीर केलें. मुसलमान लोक कुत्र्यांना नापाक ह्मणजे अमंगल जनावर समजत व आजपावतों कडकडीत मुसलमानांचा असाच समज आहे. परंतु ते अमंगळ नाहींत असें अकबरानें फरमाविलें. महमुदीयांस मदिरापानाची बंदी आहे तथापि तिचें मितसेवन करण्यास अकबराचें अनुमोदन असे. आपल्या बादशाहीच्या अखेरीस ह्मणजे इ० स० १९९२ त अकत्र- रा दाढी काढविण्याची वहिवाट पाडिली. यामुळे त्याच्या दरबा- रांतील हटवादी मुसलमानांचा फार संताप झाला. हिंदुस्थानासारख्या उष्ण देशांत श्मश्रु केल्यापासून होणारे फायदे इतके ढळढळीत आहेत कीं, त्याजविषय जास्त चर्चा करण्याचें प्रयोजन नाहीं. दाढी काढण्याबद्दल बादशहानें जरी सक्तीचा हुकुम दिला नव्हता, व हें प्रत्येकाच्या मर्जीवर बहुतेक ठेविलें होतें, तथापि या वहिवाटीप्रमाणे वागणें अगर न वागणें, हैं दरबारांत एकप्रकारें मोठें भेदसूचक चिन्ह झालें होतें. धर्मनिष्ठ मुस- लमान लोकांना दाढी काढणें, हें फारच नास्तिकतेचें कृत्य वाटे. अकबर बादशहाच्या राजवट्यांत असाच त्यांचा ग्रह होता ; व तो आजतागा तसाच कायम आहे. ह्मणून, या बाबतींत बादशहानें जो कित्ता घालून