या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तिटकारा होता. भाग १२ वा. १७७ त्याची अंमल- मुलाला अकबराने इतक्या सहनशीलतेने व क्षमाशीलानें वागविलें कीं, तें केवळ कित्ता घेण्याजोगें होतें. दुसरें, अकबरास क्रूरपणाचा फारच कर्तव्यकर्म हैं एक ईश्वराचें पूजनच होय असें तो मानी. कर्तव्याच्या बाबतींत अमुक गोष्ट कहान व अमुक गोष्ट मोठी असा फरक अकबर मुळींच करीत नसे. अमुक एक प्रकारचा फरमान किंवा हुकूम दिला जावा, असें सांगून तो स्वस्थ बसत नसे. वारी कशी काय चाळली आहे यावर त्याची नजर असे. ते सफळ झाले असल्यास तो ते शोधून अधिक परिपक्क • करी. आणि त्यांचे आपल्या प्रजाजनांतील निरनिराळ्या जातींवर काय काय परिणाम होतात हैं ही तो बारकाईने पाही. आपल्याला मनुष्याची पारख फार चांगली आहे, असा त्याला पुष्कळ विश्वास असे. चेहऱ्यावरून माणसाची पारख करण्याची कळा त्याला चांगली साधली होती यांत संशय नाहीं. यासंबंधीं, अबुलफझल यानें असें लिहिलें आहे की - " अकबर माणसांची पारख नुसत्या एका नजरेनें करी;” हें बदौनी देखील कबूल करितो, पण हिंदूंविषयीं नाकतोंड मुरडावयाचेंच ह्या त्याच्या नेहमींच्या स्वभा- वानुरूप त्यानें असें झटके आहे कीं, - यांतील गम्य अकबर हिंदू जोग्यां- पासून शिकला होता. अकबराच्या अंगीं थोर विचार व उदारता वसत होती; तरी धर्म- भोळेपणापासून तो अगदीं मुक्त नव्हता. शुभाशुभ दिवसांवर त्याचा भरंवसा असे. दिवस शुभाशुभ मानणें हें एक पारसिक धर्माचें स्वरूप आहे व त्या धर्माच्या अध्ययनानेंच अकबराची अशा प्रकारची मनोवृत्ति झाली होती, असें मि० ब्लॉकमन यांनीं लिहिलें आहे. त्याच्या दरबारांतील मंडळी व विशेषतः जे अकबराने सुरू केलेल्या धर्म- संबंधी फेरफारा विरुद्ध होते ते ह्यास अचुक मिळणाऱ्या यशप्राप्ति केवळ त्याच्या सुदैवाचें फळ असें ह्मणत. उदाहरणार्थ, बदौनीनें असें लिहिलें आहे •कीं “हुजुरांच्या मामुली सुदैवाने सर्व शत्रूंचा पराभव झाला." वास्तविक 23