या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७८ अकबर बादशहा. पाहतां त्याच्या कार्य सिद्धीची गुरुकिल्ली ही होती कीं, स्वतः व मंत्रीमंडळीनीं ज्यांचा पूर्ण विचार केला आहे अशा कायदेकानूंची व ठरावांची कलमवार तामिली कशी होत आहे ह्याकडे तो जातीनें विलक्षण जागृत नजर ठेवी. निशाण मारणें, पट्टा खेळर्णे वगैरे मैदानांतील खेळांचा, व विशेषतः शिकार करण्याचा अकबराला अतोनात नाद असे. परंतु, त्याच्या मागून बादशाही तक्तावर बसणारा जहानगीर नांवाचा मुलगा झाल्या- पासून त्यानें शुक्रवारी शिकार खेळण्याचे सोडून दिलें. याचें कारण, जहानगीर बादशहाचें ह्म॑णणें ऐतिहासिक आधार ह्मणून मानितां येई तर, असें होतें कीं त्याची आई गरोदर असतां, अकबरानें असा नवस केला होता कीं, ती सुखरूपपणें प्रसूत झाल्यास मी पुण्यदिवस जो शुक्रवार त्या दिवश कर्धी ही शिकार करणार नाहीं ; व या नवसास तो आमरण जागला. अकबराला गाण्याचा अतिशय शोक होता; इत- केच नाहीं, तर त्याचा स्वतःचा कंठ देखील फारच मधुर होता. याविषयीं हवा तितका आधार सांपडतो. गायनपटु ख्वारिझम याच्या सुश्राव्य व पुरातन रागरागिण्या ऐकून तो आनंदभरांत अगदी तल्लीन होऊन जात असे. अबुलफझलचे ह्मणण्याप्रमाणें खुद्द अकबरानें दोन- शांहून जास्त व “आबालवृद्धांस सारखेच मोहून टाकिणारीं” गाणीं रचिलीं होतीं. याच ग्रंथकाराने असे नमूद केलें आहे कीं, 'गायनशास्त्राचे हुजूरांना इतकें ज्ञान आहे कीं, तितकें शिकलेल्या गवयांना देखील नसेल.” दररोज दरबारांत गाण्याची मजलस असेच. गायनांचे ध्वनि एशियांतील बादशहांना सर्वकाल विशेष मनोहर वाटले आहेत. कल्पनाशक्तीची ईश्वरी देणगी ही अकबरास बरीचशी होती. त्यानें एक नवीन तऱ्हेचा रथ, बंदुक, साफ करण्याचे चक्र, व हत्तीवर घालण्याचें सामान हीं कल्पनेने शोधून काढिलों; व शिवाय त्यानें आपल्या सैनि- कांच्या व गोलंदाजांच्या पोषाखांत कसा फेरफार केला याविषयीं आईन ए अकबरीत वर्णन केलें आहे. 66