या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १२ वा. १७९ अकबराचें खार्णेपिणें अगदीं सार्धे असे. तो दिवसांतून पोटभर जेवण एकदांच करी. मांस भक्षण त्याला आवडत नसे; व तें तो महिनो - गणती खात नसे. तो फळफळावळीचा मोठा भोक्ता होता ; व त्यांच्या लागवडीचा तर त्याने अभ्यासच केला होता. फळफळावळ ही “ परमेश्वराच्या महान् देणग्यापैकीं एक देणगी आहे" असें अकबर मानी, व त्यांच्या लागवडीकरितां त्यानें इराण व तुराण येथून हुशार बागवान बोलावून त्यांना आग्रा व फत्तेपूर शिक्री या ठिकाणीं वस्तीस ठेविलें, असें अबुलफझल लिहितो. तेथें “खरबुर्जे व द्राक्षे हीं फारच उत्तम व विपुल आलीं आहेत; आणि कलिंगर्डे, सप्ताळू, बदाम, पिस्तें, दाडिबें वगैरे तर जिकडे पाहावें तिकडे दिसतात" या इतिहासकाराने आणखी असें ही लिहिलें आहे की यावेळीं काबूल, कंदाहार, काश्मीर, बदकशान आणि समरकंद येथून ही अनेक प्रकारचें फळफळावळ व मेवा ही दिल्लीस मनमुराद येत असे. आईन ए अकबरींत ह्यांची एक लांब यादी दिली आहे; व हिंदुस्थानची माहिती आहे अशांनी ती वाचिली असतां आनंद होण्यासारखा आहे. त्या कालांत देखील हिंदुस्थानांतील सर्व मधुर फाळांत आम्रफळालाच अग्रस्थान देत ही एक मोठी लक्षांत ठेवण्याजोगी गोष्ट आहे. याचा रंग, सुवास व रुचि हीं केवळ अद्वितीय ह्मणून वर्णिलीं आहेत; व इराण व तुराण येथील खादूनंदन मंडळी तर याला खरबुर्जे, टरबुर्जे व द्राक्षै याहून ही श्रेष्ठ मानीत. " आग्रा अथवा फत्तेपूर शिक्री येथें रहात असतां अकबर अपला दिवस कसा घालवी व साधारणतः त्याचा नित्य क्रम कसा होता याजविषय दोन शब्द लिहिणें अगत्याचे आहे. तो रात्रीचा फार वेळ जागत असे, अर्से दिसतें. संभाषण व वादविवादास सायंकाळीं आरंभ होऊन ते रात्र- भर थेट पहाटपर्यंत चालत. “ दिवस उघडण्यापूर्वी एक प्रहरपर्यंत" तो या व्यासंगांत राही, व मग गवई हजर होऊन • असें अबुल फझलच्या इतिहासावरून कळून येते. गायनास सुरवात होई, दिवस उगवतांच तो