या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८० अकबर बादशहा. आपल्या खाजगी महाळांत जाइ व स्नान करून पोषाख चढवून सासरी एका तासानें दरबारी मंडळींचे मुजरे घेण्याकरितां विराजमान होई. नंतर - दररोजच्या कारभारास सुरावत व्हावयाची. हा कारभार बहुतकरून मध्यान्हास बराचसा अवकाश असतांनाच आटोपत असे; अकबरच्या खान्याची मुक्रर ह्मणून वेळ नसे. तथापि या सुमारास तो दिवसांतून जो एक खाना खात असे तो वाढून येई. तिसरा प्रहर ह्मणजे त्याची आराम घेण्याची वेळ समजली जात असे. कधीं कधीं, अकबर पाहाटेची वेळ निशाण मारण्यांत, व शिकार करण्यांत घालवी. व केव्हां केव्हां तो संध्याकाळच्या समय चौगन अथवा पोलो नांवाचा खेळ खेळे. या खेळाकरितां पळसाच्या गोट्या केलेल्या असत. व त्या पेटवून रात्रीं खेळ होई. दिवसान्ना जो अतिशय उष्णकाळ तोच त्याच्या विश्रांतीचा च ताजा तवाना होण्याचा वेळ असे. गादीवर बसून फार दिवस झाले नाहींत तोंच राजपुतान्यांतील हिंदु राजांना केवळ मैत्रीपेक्षां जास्त निकट बंधनानें बादशाही तक्तास जोडण्याचे महत्व अकबराचे लक्षांत आलें. आतां राजस्थानांतील लच्च जातींचे बहुतेक राजे व राजपुत्र मोंगलांशी शरीरसंबंध करणें ह्मणजे आपल्या पदरीं हलकेपणा घेणें, असें मनांत समजत. तेव्हां त्यांच्या मनांत याप्रमाणें स्वभावतःच आढी असतां ती अकबरानें कोणत्या युक्तिप्रयुक्तीनें दूर केली, हें लक्षांत आणिलें ह्मणजे घटकाभर कौतुक वाटतें. या बाबतींत त्याचा बाप हुमायून यार्ने बऱ्याच अंशी त्याचा मार्ग सुगम करून ठेविला होता, असें ह्मणतां येईल. आपल्या राजवट्याच्या प्रारंभीं चितूरची राणी कर्णावती हीस त्यानें आपली भगिनी मानून तिचे संरक्षणार्थ जन्मभर चाकरी करण्याची त्यार्ने प्रतिज्ञा कशी केली, इत्यादि गोष्टी कर्नल टॉड यांनीं आपल्या मोहक व विद्वत्तासूचक प्रथांत वर्णिल्या आहेत. ही चाकरी हुमायुनानें फारच इमानानें बजाविली. तो तिला नेहमी "सद्गुणी व प्रिय भगिनी" ह्मणून हांक मारीत असे. राणार