या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १२ वा. १८१ भगवानदास, ज्याविषयीं या पुस्तकांत अनेक वेळां उल्लेख आला आहे, त्याचा बाप अंबरचा राणा, राजाबिहारीमल, याचा ही हुमायुनानें प्रेम क आदर संपादिला होता. पुढे अकबराने त्याच्या मुलीशी लग्न केलें; आणि या योगानें अंबरच्या- जयपूरच्या-घराण्याशी संबंध जडल्यामुळे, राणा भगवानदास व त्याचा पुतण्या आणि दत्तक पुत्र महापराक्रमी सेनापति राणा मानसिंग हे उभयतां निकट स्नेही झाले, असा त्याला भरंवसा आला. कर्नल टॉड या दुसऱ्या एका पानांत राणा भगवानदास याजविषयीं असें लिहिलें आहे कीं, “तो अकबाराचा जिवलग मित्र होता, व अशा पुरुषाची स्वामि- भक्ति संपादण्याचें माहात्म्य अकबरास कळून चुकलें होतें.” रजपूत राजांच. खरोखर मनें कशीं होतीं हैं समजून घेण्याची साधनें कर्नल टॉडच्या सारख दुसऱ्या थोडक्याच लोकांना मिळालीं असतील. ते साहेब आणखी असें ही म्हणतात:-- “ मुसलमानांशी प्रथमतः शरीरसंबंध घडवून रजपुतांच्या विमळतेस कालिमा आणिली ह्मणून राज्यस्थानांतील लोक राणा भगवानदास याच्या नांवानें अद्याप बोटे मोडतात." अविचार ग्रह हा मोठा बलवत्तर असतो; व कुत्र्याप्रमाणे, केलेल्या वमनाकडे पुनः परतण्याची त्याची प्रवृति असते. राजस्थानांत राणा भगवानदास व त्याचा पुतण्या राणा मानसिंग यांच्याहून अधिक थोर अंतःकरणाचे व उदार वृत्तीचे राजपुत्र निपज - लेच नाहींत. मोंगल बादशहाचे वर्चस्व राजपुतान्यांत संमत झालें, याचें मुख्य कारण या उभयतां नरवीरांशी दृढ ऐक्य हैं होय, हे ऐक्य पुढें राणा भगवानदास याची कन्या व शहाजादा सलीम यांचा पूर्वी सांगितल्या- प्रमार्णे विवाहसंबंध घडल्यामुळे दृढतर झालें. खुद्द रजपुतापेक्षांही मनानें . अधिक रजपूत जो कर्नल टॉड यानें अकबराच्या कारकीर्दीचें संक्षिप्त वर्णन केलें आहे त्यावरून त्याच्या बादशाहीचा या बाणीदार खऱ्या क्षत्रियवंशाचे लोकांवर खरोखर काय परिणाम झाला हें कळून येण्याजोगे आहे.