या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८२ या ग्रंथकारानें असें संस्थापक अकबर होय. अकबर बादशहा. लिहिलें आहे कीं "मोंगल राष्ट्राचा खरा रजपुतांचे स्वातंत्र्य प्रथमतः हस्तगत करून घेण्याचें श्रेय याच्या कडेच आहे. या कामी त्याच्या सद्गुणाचे त्याला फार मोठें साह्य मिळालें. त्यांच्या मनोवृत्तीचे व त्या मनोवृत्ति कशानें जागृत होतील ह्याचें ज्ञान करून घेण्याची कुशलता त्याच्या अंगी अस- त्यामुळे त्याला त्यांना कोणचे सोनेरीपाश घालावे हे सहज समजकें. पुढे, संवयीच्या योगानें आणि विशेषतः बादशहा जसजसा त्यांच्या देशाचा बडेजाव व कांहींसे निंद्य छंद पुरविण्यांत आपल्या अधिकाराचा उपयोग करी, तसतशी ही बंधनें त्याच्या आंगवळणी पडली. अकब- राच्या राजनीतीचें तत्व, ह्मणजे राष्ट्रांत केवळ एकोपा करण्याकरितांच नवीन विजय संपादणें, याचा उमज पडण्याची साधने व आकलन नस- ल्यामुळे व त्याच्यापूर्वी होऊन गेलेल्या अफगाण व पठाण बादशहा- प्रमाणेच हा ही असेल या समजुतीनें कर्नल टॉड हे त्याच्या विजय- संपादनास दोष देतात. तथापि, त्यांना देखील लिहिर्णे भाग पडले की " अकबराने आपल्या महत्वाकांक्षेने केलेले घाव अखेरीस भरून आणण्याचे श्रेय घेतले; आणि त्याच्या कुळांत कर्धी कोणास मिळाली नाहीं अशी त्यानें कोट्यावधि प्रजाजनांकडून वाहवा मिळविली " कोट्यावधि प्रजाजनांना सुखसंपदा देणे, हाच जर राजपणाचा मुख्य उद्देश आहे, व ह्या हेतूस्तव एकोपा साधण्यास विजय संपादन जर हवें आहे, तर धारिलेल्या उद्देशासाठी या योजिलेल्या उपायांना साधुता येते हे मानणे रास्त आहे. राजस्थानांत राज्य करावें ह्मणून अकबराने राजपुताना जिंकिला नव्हता. हा प्रांत जिंकण्यांत त्याचा इतकाच हेतु होता कीं कधीं ज्याचा जांच ह्मणून वाटला नाहीं अशा आपल्या सार्वभौम बादशाही वर्चस्वामुळे एकंदर राष्ट्रास प्राप्त झालेली शांतता व आबादानी हीं अनुभवून प्रत्येक रजपूत राजाला आपआपल्या संस्थानांत हितकर व उचित असा राज्यकारभार चालवितां यावा. ०