या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२
अकबर बादशहा.

लोकांसह शहर सोडून जाण्यास त्यास परवानगी मिळाली.प्रथम तो युरेटिप एथें गेला व शेवटीं युरेटिपवर राज्य करणाऱ्या खानाने दिलेल्या डेहकाट नांवाच्या खेड्यास गेला.पुढील तीन वर्षे देवावर हवाका ठेवून त्यानें राज्य मिळविण्याच्या खटपटींत व साहसांत घालविलीं. आज अरण्यांत हद्दपार झालेला तर उद्यां स्वारी करून गादी मिळवीत आहे. सर्वदा आनंदी, व अखेरीस आपणास जय मिळेल अशी खात्री असल्या- मुळे सदा हिंमतदार व उत्साही. अशा रीतीनें त्यानें हा काळ घालविला. फरघणा फिरून मिळविण्याचा त्यानें यत्न केला; परंतु त्यास सोडून देर्णे भाग पडलें. नंतर निरनिराळ्या प्रांतांतील दोन तीनशे लोकांनिशीं खोरासनावर स्वारी करण्याचा त्यानें निश्चय केला.हा केवळ वेडेपणा. दिसत होता, पण त्या वेडेपणांत ही पद्धत होती.त्यानें ही स्वारी कशी केली व तिचा परिणाम काय झाला याचें वर्णन पुढील भागांत केलें आहे.



भाग तिसरा.
बाबर काबूल जिंकतो.

॥ क्रिया सिद्धिः सत्वे भवति महतां नोपकरणे ॥
॥ यशसिद्धी थोरांना निजसले लाभते न उपकरणें ॥

ज्याला आपण संध्यां पूर्व अफगणिस्थान ह्मणतों तो प्रदेश, ह्मणजे काबूल व गिझनी हे प्रांत, यांचाच फक्त त्या वेळचे काबूळचे राज्यांत समावेश होत असे. हिरात ही एका स्वतंत्र राज्याची राजधानी होती. या वेळीं हें राज्य मध्य एशियांत सर्वात मोठें होर्ते. काबूलचे राज्याश ज्यांचा संबंध नाहीं असे सरदार कंदाहार, बजोर, स्वाट आणि या पेशवर प्रांतांवर राज्य करीत होते.खास काबूल प्रांतांत ही, सपाट जमी- नीवर व खिंडींत राहणारे लोक मात्र तेथील राजाची सत्ता मानीत असत.डोंगराळ प्रदेशांतील लोक त्यांच्या हल्लींच्या वंशजाप्रमाणेच