या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १२ वा. १८३ त्यावेळीं सर्व रजपूत राजांत जो अतिशय प्रबळ, जोधपूरचा राजा, राणा उदेसिंग त्याच्या मुलीचें शहाजादा सलीम याच्याशीं अकबरानें लग्न जुळवून आणिलें. पुढें सलीम अथवा जहानगीर बादशहाच्या मागून तक्तावर विरा- जमान झालेला जो शहाजहान बादशहा तो ह्याच राजकन्येचा मुलगा. या शहाजहानामुळे रजपुतलोकांना हिंदुस्थानांत केवळ अश्रुतपूर्व असें • महत्व आलें. या लग्नापासून फलनिष्पत्ति खरोखर फारच गोड झाली. याविषयों, कर्नल टॉड यांनीं असें लिहिलें आहे कीं, हा संबंध जुळवून आणण्यास अकबराला चार सुभ्यांची देणगी लांच द्यावी लागली; ह्या देणगीनें मारवाड ( जोधपूर ) संस्थानाचा वसूल एकदम दुपटीनें वाढला. या ग्रंथकाराने आणखी असें ही नमूद केलें आहे :- "अंबर व मारवाड यांच्या सारखीं उपाहरणें डोळ्यापुढे असल्यामुळे व आमिष सोडून देण्याची निरीच्छता कमी असल्या कारणानें, राजस्थानांतील लहान लहान सरदार आपल्या असंख्यात आणि शूर अनुयायी वर्गासह बादशहाचे मांडलिक बनले; व या रुपांतराने त्यांच्यांतील बहुतेक सर- दारांचें महत्व दुणावलें. " ही सरदार मंडळी "बादशाही तक्ताचे आधार व भूषण आहेत" असें जें मोंगल इतिहासकाराचें म्हणणें तें यथार्थच आहे. कर्नल टॉड यांना रजपुतांविषयीं अतिशय कळकळ व अभिमान होता ; तेव्हां या कैवारी इतिहासकारानें राजापुताना व तेथील राजे- रजवाडे यांच्याशीं अकबराने जें धोरण व कारस्थान लढविलें, त्याचें जें हैं समर्थन केलें आहे त्याहून अधिक प्रमाणभूत समर्थन असूच शक- णार नाहीं. 9 बादशाही घराण्यांतील लग्नसंबंधी गोष्टींचा वृत्तांत लिहीत असतां, अकबरास अनेक बायका होत्या ही गोष्ट ही येथें सांगण्यास हरकत नाहीं. परंतु यापैकीं फक्त आठ बायकांविषयींचाच उल्लेख आधारपूर्वक केलेला आहे. त्याची पहिली बायको त्याची चुलत बहीण, ह्मणजे त्याचा चुलता