या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८४ अकबर बादशहा. हिंदाळमिरझा याची मुलगी होती. हिच्यापोटीं कांहीं संतति झाली नाहीं; व अकबराच्या मार्गे, ती आपल्या वयाच्या चवऱ्याण्णावे वर्षापर्यंत वांचली. त्याची दुसरी बायको बाबरच्या मुलीची मुलगी ह्मणजे त्याची आतेबहीण होती. हिचा बाप मिरझा - नुरुद्दीनमहमद हा होता. ही राणी कवि ह्मणून प्रसिद्ध आहे; व तिर्ने मखपी ( अथवा गुप्त कवि ) हें नांव घेऊन या नांवावर अनेक पर्चे रचिलीं. त्याची तिसरी बायको राजा बिहारीमल याची मुलगी व राणा भगवानदास याची बहीण होती. इर्चे लग्न इ० स० १९६० या वर्षी झाले. त्याच्या चवथ्या बायकोची सौंदर्याविषयीं फार ख्याति होती. तिचें पहिले लग्न अबदुलवासी याजबरो- बर झालें होतें. पांचवी बायको जोधबाई, ही जोधपूरच्या राण्याची कन्या होती. हीच जहानगीरची आई. तेव्हां युवराजमाता ह्मणून सर्व जनान- खान्यांत तिचीच गणना अग्रस्थानी होती. बाकी राहिलेल्या ह्मणजे सहावी, सातवी आणि आठवी, ह्या तिन्ही बायका मुसलमानिणी होत्या. देशांतील अंतर्व्यवस्थेकडे पाहिलें असतां, जमीनीचा धारा वसूल करण्याच्या पद्धतीकडे अकबरानें बरेंचर्से लक्ष दिलें होतें, असें दिसतें. तो सिंहासनारूढ झाला तेव्हां त्याच्या बापाचा पराभव करून त्यास हिंदुस्थानांतून ज्यानें हांकून काविलें त्या शीरशहानें काढिलेली पद्धति चालू होती. या पद्धतीची रचना ज्या तत्वांवर होती तीं येणेंप्रमाणे:- ( १ ) जमीनीची बरोबर मोजणी करावयाची. ( २ ) जमीनीचे विभाग करून प्रत्येक विभागांत सरासरीने एका बिघ्याचें ( ह्मणजे वायव्येकडील प्रांतांत एकरचें व बंगाल्यांत ३ एकरचें ) उत्पन्न किती आहे तें काढावयाचें. (३) आणि मग या आकारणीवर सरकारांत द्यावा कागणाऱ्या उत्पन्नाचा हिस्सा ठरवावयाचा ( ४ ) व अशा ठराव केलेल्या हिश्शाचा किंमतीवर बसविलेल्या धान्याच्या रकमेची इयत्ता करावयाची. ही पद्धत न मोडतां ती सुधारून प्रगल्भदशेस आणण्याचा अकबरार्ने विचार केला ; व हा उद्देश साधण्याकरितां तेव्हांपर्यंत चालत कायम O