या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८६ अकबर बादशहा. राज्यांतील जमीनीचे त्यानें पुढें पांच वर्ग केले. जमीनीचे निरनिराळे दर्जे राखतां यावे, ह्मणून आणखी ही कित्येक नियम मोठ्या काळजीनें केले होते. एकंदरीत प्रजेला व सरकाराला ही रास्त अशी जमिनी- वरील धान्याची पद्धति ठरवितां यावी, हाच कायतो कानूंचा उद्देश होता. या सर्व कायदे वर निर्दिष्ट केल्याप्रमाणे, अकबराचें राज्य जसजसें स्थिरस्थावर होऊं लागले तसतसे सरकारधान्याची रकम ठरविण्याच्या बाबींत चांगलीं चांगलीं तवें अंमलांत येऊ लागलों. याकरितां जमीनीची पाहणी होण्यापूर्वी एकोणीस वर्षांचे बाजारभावाचे तक्ते पाटील पटवाय- मार्फत तयार करवून दरबारांत आणविले; व त्यांची सरासरी काढून चालू निरखाप्रमाणे उत्पन्नांची किंमत लाविली. प्रथमतः जमाबंदीचे ठराव दरसाल होत असत. परंतु सालोसाल बदलणारे ठराव त्रास- दायक आहेत असे प्रत्यंतरास आले तेव्हां मागील दहा सालाच्या सरा- सरीवर पुढील दहाँ सालांकरतां जमाबंदीचा ठराव एकदम करण्यांत आला. 'ही शेतकीच्या धान्याची व्यवस्था पूर्णतेस आणण्याकरितां बाद- शाही मुलखाचे अकबराने वसुलास सोईचे असे नवीन विभाग केले. या योजनेप्रमाणे एक कोटी दामाचा ह्मणजे पंचवीस हजार रुपये तह- शिलीचा एक असे एकंदर राज्याचे विभाग केले. दाम हैं एक त्यावेळी तांब्याचे नाणे असून त्याची किंमत रुपयाचा एक चाळिसांश होती. सध्यांची दमडी दामाचा एक अष्टमांश आहे. .. नवीन केलेल्या प्रत्येक भागाचा वसूल करणाऱ्या अंमलदारास करोडी ही संज्ञा दिली. जेव्हां करोडीपाशीं दोनलाख दाम वसूल जमे, तेव्हां ती रक्कम त्यास दिल्ली येथें सदर खजीनदाराकडे खाना करावी लागे. पुढें, केवळ गणितशास्त्राच्या अनुरोधानें रचिलेल्या या पद्धतीपासून घोटाळा होऊन अत्यंत पुराणप्रिय अशा हिंदुलोकांना मान्य अशा वहिवाटींस हर-