या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १२ वा. १८७ तेव्हां या गोष्टींचा कत येते असें कांहीं दिवसांनी आढळून आलें. प्रत्यय आल्यावर हे कृत्रिमविभाग मोडून टाकिले व त्यांच्या ऐवजीं प्राचीन विभागांची, ह्मणजे प्रांताच्या स्वाभाविक स्त्ररूपावरून झालेल्या भागांची व खेडीं, पाटील, कुळकर्णी इत्यादि व्यवस्थेची पद्धति पुनः सुरू झाली. जमीनीवरील धारा वसूल करण्याकरितां मक्ते देण्याची वहिवाट अकबरास अगदीं नापसंत होती; कारण असे मक्ते देणें ह्मणजे प्रजेस जाचणूक करण्याचा एक अचुक मार्ग खुला करून देणें आहे, असें त्यास वाटे. त्यानें आपल्या कमावीसदारांना व तहशीलदारांना असा एक मुद्दाम हुकूम फरमाविला कीं, होईल तेथपावेतों गांवचे मुकद्दम पाटील यांच्याशीं व्यवहार न ठेवितां खुद्द खातेदाराशीं ठेवावा. ही व्यवस्था अगदीं नवी होती व ती सुरू करण्यांत त्याचा उद्देश अत्यु- त्तम होता. तथापि ही व्यवस्था कामास पडली नाहीं. कारण, प्राचीन काळापासून हिंदुलोकांत जुन्या वहिवाटीचे माहात्म्य फार आहे व या जुन्या वहिवाटीप्रमार्णे गांवच्या मुकद्दम पाटलाचे वजन सर्व- मान्य असें आहे. ह्मणून व्यवहारांत सरकारी अधिकाऱ्यांस त्यांच्याशीं निदान मिळून तरी वागणे भाग पडलें. | जमीनीच्या वहितीसंबंधानें विचार करीत असतां, अकबर बादशाहास असें कळून आलें कीं, आपल्यापूर्वी होऊन गेलेल्या बादशहांनी अपात्र इनामें व जहागिरी दिल्या आहेत इतकेंच नाहीं, तर आपण नेमलेले मुलकीकडील कामगार लोक ही थोडे बहुत लांचलुचपत खाणारे व इतर खोटीं कार्मे करणारे असे आहेत. चितूरचा वेढा चालला असतां फैली अकबराच्या गोटांत जाऊन मिळून, त्याचें बादशहावर चांगलें वजन बसल्यावर लवकरच अकबरास कळून आलें कीं दरबारांत जे दांभिक आपल्या पवित्रपणाचा मोठा डौल मित्रीत, तेच या दुष्ट व अघोर कृत्यां- संबंधानें मुख्य दोषी आहेत. याबद्दल अर्थातच त्यास अत्यंत दुःख :