या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८८ झालें. अकबर बादशहा. पुढें लागलींच या कामगार मंडळींना मक्केस पाठविण्याच्या मिषानें हद्दपार केलें. आणि मग मुलकी खात्यासंबंधीं साद्यंत चवकशीस प्रकारच्या लोकांनाच यांपैकी पहिल्या वर्गा सुखात झाली. राजार्ने सरकारांतून फक्त चार काय तें मदत करणें इष्ट आहे असें ठरलें होतें. लोक, ह्मणजे ज्यांनीं आपलें तनमन विद्यार्जनाकडे व ज्ञानार्जनाकडे काविलें आहे व ज्यांचेपार्शी कांहीं संपत्ति नव्हती, अशा प्रकारच्या पुरुषांना मध्यान्हीविषयीं काळजी बाळगावयास लावणे इष्ट नाहीं असें वाटलें. जे लोक आत्मसंयमन व इंद्रियदमन करण्यांत आपला देह सतत कष्टवितात; व मानवी स्वभावाच्या स्वार्थपर मनोविकारांशी झुंज - ण्यांत गुंतल्यामुळे, ज्यांनी संसाराचा परित्याग केला आहे, असे लोक दुसऱ्या वर्गात येत. तिसरा वर्ग झटला ह्मणजे, ज्यांना काम काज करण्याची ताकद नाहीं, असे दुर्बल व अनाथ लोक सभ्य घराण्यांतील प्रतिष्ठित पण खालावलेले लोक, ज्यांना इतर शिक्षण न मिळाल्यामुळे व्यापारधंदा करून आपले पोट भरण्याचे सामर्थ्य नाहीं, अशा प्रकारच्या लोकांचा चवथ्या वर्गात समावेश असे. या चारी वर्गातील याचकांच्या स्थितीसंबंधीं पूसतपास करण्याकरितां अनुभविक व नेकीचे अंमलदारांची नेमणूक केली होती; त्यास सदर किंवा मुख्य हा किताब असून काजी व न्यायाधीश यांच्यापेक्षां त्यांचा दर्जा श्रेष्ठ होता. पुढें फैझीच्या सांगण्यावरून अकबरानें या एकंदर खात्याची तपासणी सुरू केली, तींत हैं खातें ह्मणजे एक लांचलुचपतीचें आगरच आहे, असें त्यास आढळून आलें. तेव्हां थेट सदर अंमलदारा- पासून तो यःकश्चित काजीपर्यंत त्यानें सर्वोस एकदम फांटा दिला; व. त्यांचे जार्गी निराळ्या तऱ्हेच्या लोकांची योजना करून सक्त अशा कायदेकानूंनीं त्यांचे अधिकार मर्यादित करून टाकिले. बादशहा या नात्यानें अकबरास सरकारी नोकऱ्या व कामगिऱ्यांबद्दल- इनाम देणें अवश्य होर्ते, झणून आपल्या इमानी व तत्पर लोकांस जमीन