या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १२ वा. देण्याचें काम ही त्याजकडे आले. १८९ ह्याप्रमाणें तो मनसबदार अथवा बक्षी या हुद्याच्या लष्करी अमलदारांस रोख तनखा न देतां त्या ऐवजी जमीनीची हंगामी जहागिरी देत असे. अकबराच्यापूर्वी होऊन गेलेल्या बादशहांत अतिशय प्रबळ, आणि हुमायून यास हिंदु- स्थानांतून हांकून लावणारा जो शीरशहा, त्याने आपल्या हाताजवळील अफगाण सरदारांस इनाम व जहागिरी यांची रेलचेल करून दिली होती. अकबराने या देणग्या कोणत्या कामगिरीबद्दल, कर्धी, व कोणत्या हुकुमावरून दिल्या इत्यादि गोष्टींची बारीक चवकशी केळी व पुष्कळ लोकांच्या देणग्या खालसा करून परत घेऊन त्या आपल्या अनुयायांस दिल्या. अकबरानें हें जें वर्तन केलें तें मागील बादशहांनीं घालून दिलेल्या वळणास अनुरूपच होते. तथापि, याप्रमाणें वागण्याला मागील वहि- वाटीपेक्षां त्यास बलवंत्तर कारण होते; तें हें कीं, इनामदार व जहागी- रदार यांस देणगीच्या सनदांत जमीन दिली होती तिचा व वस्तुतः त्यांनीं कबजांत घेतली त्या जमीनीचा कचितच मेळ असे. दुसरें, कधीं कधीं असें होई कॉं, सनदेंतील मजकूर इतक्या अस्पष्ट व मोघम शब्दांनी लिहिलेला असे कीं, इनामदारांस व काजी व सदर वगैरे कामगारांना लाचलुचपत देऊन, मनास वाटेल तितकी जमीन बळका- वण्यास फावे. तेव्हां न्यायदृष्टीनें व सरकार व रयत ह्यांच्या हिता- - कडे नजर देऊन पाहतां, सनर्देत दिलेल्यापेक्षां जास्त जमीन कोणाच्या ताव्यांत आहे असे आढळल्यास ती खालसा करण्याचा बादशहास पूर्ण अधिकार होता. याशिवाय, अकबराच्या असें ही लक्ष्यांत आलें कीं, महमुदीय धर्मातील मौलवी ह्मणविणाऱ्या मंडळीनीं आपण लहान असतां, व फैझीच्या सांगण्यावरून सुरू केलेल्या चवकशी पूर्वी, मनास वाटेल तितकी जमीन बळकाविली होती; ही मंडळी बायबलमध्ये चर्णन केलेल्या अधाशी फारिसीस् नामक महंत वर्गासारखी होती.